महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदने याला मोठा झटका, कोर्टाचा मोठा आदेश आला; आता पोलीस…

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या आदेशाने PSI बदने याला मोठा झटका बसला आहे. नेमकं काय झालं वाचा...

महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदने याला मोठा झटका, कोर्टाचा मोठा आदेश आला; आता पोलीस...
Phaltan Doctor
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 26, 2025 | 7:52 PM

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला आज फलटण कोर्टात हजर करण्यात आले होते. महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी पीएसआय गोपाल बदनेने चारवेळा तिच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला होता. आरोपी बदनेला कोर्ट किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता कोर्टाचा मोठा आदेश समोर आला आहे. तसेच आयपीएस बदनेला मोठा झटका देखील बसला आहे.

काय आहे कोर्टाचा आदेश?

फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे कोर्टने हे कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र आरोपीचे वकील अॅड. राहुल धायगुडे यांनी आरोपीचा यात कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आरोपी बदने याला 1 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला.

वाचा: आमदाराच्या खास माणसाचे घाणेरडे चाळे, महिलेसोबत अश्लील डान्स, कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार व्हायरल!

IPS बदनेला मोठा झटका

दरम्यान, सरकारी वकील अॅड. सुचिता वायकर-बाबर यांनी आक्षेप घेत मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नसते असा दाखला देत आरोपीच्या मेडिकल टेस्ट, मोबाईल, वाहन तसेच घटनास्थळाचा तपास करायचा असून आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायाधीश ए. एस. साटोटे कोर्टने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे.

काय आहे प्रकरण?

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीमध्ये स्वत:ला संपवले. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉक्टर महिला राहत होती. पण अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यमध्ये देखील वाद झाला होता. प्रशांत बनकरला राग अनावर झाला. त्याने या वादानंतर तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं म्हणून तरुणी डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. सुसाईट नोटमध्ये तरुणीने गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचा उल्लेख केला होता.