AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दौंड कलाकेंद्र गोळीबारप्रकरणी अजितदादांची मोठी माहिती, जखमी डान्सरबद्दलचं सत्य समोर!

पुण्यातील दौंड येथील कलाकेंद्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो का, याची चाचपणी केली जाणार आहे.

दौंड कलाकेंद्र गोळीबारप्रकरणी अजितदादांची मोठी माहिती, जखमी डान्सरबद्दलचं सत्य समोर!
pune daund kala kendra firing
| Updated on: Jul 24, 2025 | 3:33 PM
Share

Pune Daund Kalakendra Firing : पुण्यातील दौंड येथील अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना झाली आहे. एका आमदाराच्या भावानेच हा हवेत गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे गोळीबाराच्या या घटनेत कलाकेंद्रात नृत्य करणारी एक तरुणी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत होते. एका आमदाराच्या भावाचे नाव या प्रकरणात आल्यामुळे राज्यभरात त्याची चर्चा झाली. दरम्यान आता याच घटनेविषयीची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या प्रकरणात कोणतीही महिला जखमी झालेली नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. तसेच गोळीबाराच्या घटनेत मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का? याचीही चाचपणी करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

या प्रकरणात कोणीही जखमी झालेले नाही

अजित पवार माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना दौंडमधील गोळीबार प्रकरणी विचारण्यात आले. यावर बोलताना, दौंडमधील कलाकेंद्रात झालेल्या गोळीबाराप्रकरणी मी तेथील अॅडिशनल एसपीकडून माहिती घेतली. या प्रकरणात चुकीचे वृत्त दिले गेले.एका महिलेला गोळी लागली आणि ती जखमी झाली, असे वृत्त पसरले. मी या प्रकरणी पोलिसांना सांगितले की नीट तपासणी करा, त्या महिलेला एखाद्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे का ते पाहा, असे सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच, पोलिसांनी मला सांगितले की या प्रकरणात कोणीही जखमी झालेले नाही. आम्ही व्यवस्थित माहिती घेतली. तिथे हवेत गोळीबार झाला. हा गोळीबार पाहून तिथे एक महिला बेशुद्ध पडली. त्या महिलेला पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणण्यात आले. तिथे कोणलाही कुठलीही जखम झालेली नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

तो मांडेकरांचा सख्खा भाऊ नाही

या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, असे मी तेथील पोलिसांना सांगितले आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तशा सूचना दिलेल्या आहेत. या प्रकरणात जी नावे समोर येतील त्यांना अटक करा, असे मी सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच या प्रकरणात भोर वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचे नाव घेतले जात आहे. तो मांडेकरांचा सख्खा भाऊ नाही. तो चुलत भाऊ असण्याची शक्यता असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना कोणीही असूद्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

कोका कायद्याअंतर्गत होणार गुन्हा दाखल?

तसेच या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्याचा मी आदेश दिला आहे. आरोपींकडे शस्त्र ठेवण्याचा परवाना आहे का? याचाही तपास होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. जमलं तर या प्रकरणात मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का, ते पाहण्याच्याही सूचना करण्यात आल्या असल्याची महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच