AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती लोकसभा लढण्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, दादा खरंच…

Jayant Patil on Ajit Pawar Statement About Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांना शांत झोप लागू द्या, एक तर आधीच...; जयंत पाटील असं का म्हणाले... अजित पवार यांच्या शरद पवार यांच्या बाबतच्या वक्तव्यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

बारामती लोकसभा लढण्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचं सूचक विधान;  म्हणाले, दादा खरंच...
| Updated on: Dec 02, 2023 | 2:24 PM
Share

योगेश बोरसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 02 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जतमध्ये बोलताना अनेक गौप्यस्फोट केले. यावेळी आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल, ही निवडणूक कशी होईल, याची राज्यभर चर्चा होऊ लागली. या बाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांचा पक्ष वेगळा झालेला आहे. त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही मतदारसंघ ते लढवतील. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचंय, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दादा मुख्यमंत्री होणार?

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी टोला लगावला. दादा मुख्यमंत्री होणार की नाही हे मला माहित नाही. पण एकनाथ शिंदे यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ, असं जयंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

एकनाथ शिंदे बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. परिस्थिती अशी की ते कधीही पदावरून जातील म्हणून IAS अधिकारी IPS ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. सगळं सरकारच ठप्प होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाहीत. तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवन योग्य नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीवर म्हणाले…

कोण मुख्यमंत्री होणार याची तशी बरीच यादी मोठी आहे. उरलेल्या जागांची ही घोषणा अजित पवार करतील. भाजपने बरीच माघार घेतलेली दिसत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीत राष्ट्रवादी किती जागा लढवणार, असं विचारलं असता लोकसभेचे आमचं अगणित अजून ठरलं नाही.थोड्या दिवसानंतर चर्चा होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....