Ketan Agarwal Murder : तर सियाही खोल दरीत पडली असती… चलाखीने वाचवला जीव; सिया-चेतनचा कुटील प्लान उघड

पुण्यातील केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, केतनच होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी या हत्येचा कट रचला होता; त्यासाठी प्रत्येक लहान-मोठ्या कृतीचे नियोजन त्यांनी अत्यंत बारकाईने आणि आधीच केलं होते. गुन्ह्याच्या ठिकाणचे दृश्य पुन्हा उभे करून (री-क्रिएशन) आणि त्यानंतरच्या चौकशीतून आता अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत.

Ketan Agarwal Murder : तर सियाही खोल दरीत पडली असती... चलाखीने वाचवला जीव; सिया-चेतनचा कुटील प्लान उघड
लोहगडावर केतन अग्रवालचा मृत्यू
| Updated on: Jun 29, 2026 | 9:25 AM

पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा, केतन अग्रवालचा 18 जून रोजी लोहगडावरून पडून मृत्यू झाला. सिया गोयल हिचं केतनशी लग्न ठरलं होतं, मात्र तिला त्याच्याशी लग्न करायची इच्छा नव्हती, म्हणून तिने , चेतन चौधरी या मित्रासह मिळून केतनच्या हत्येचा प्लान रचला आणि 18 जूनला त्याला लोहगडावर नेऊन तिथून खाली ढकललं. अख्खा देशाला हादरवणाऱ्या या केसप्रकरणी चेतन आणि सियाला अटक करण्यात आली असून आज, 29 जून रोजी त्यांची पोलिस कोठडी संपणार आहे. त्यापूर्व अधिकाधिक माहिती आणि पुरावे मिळावे यासाठी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून काल सिया हिला पोलिसांनी लोहगडावर सीन-रिक्रिएशनसाठी नेलं होतं.

या अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी या हत्येचा संपूर्ण कट अत्यंत बारकाईने रचला. पोलिसांचे म्हणणे आहे की, लोहगडावर इच्छित ठिकाणी पोहोचल्यावर, चेतनला पाहताच सियाने अचानक खाली वाकण्याची जी कृती केली, ती केवळ (केतनवरील) हल्ल्यासाठीचा इशारा नव्हता, तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, बचावासाठी आखलेली एक रणनीती देखील होती.

खाली बसून केतनचा ढकलण्याचा इशारा

केतनला मारण्यापूर्वी सिया आणि चेतनने फुल ऑन डिटेल्ड प्लानिंग केलं होतं. लोहगडावर इच्छित स्थळी पोहोचल्यावर सिया हिने पाणी पिण्यासाठी किंवा बुटांची लेस बांधण्यासाठी खाली बसावं, असा ठरलं होतं. तो एकाप्रकारचा संकेतच होता. आणि सिया खाली बसल्यावर तो संकेत मिळाल्यावर चेतन मागून येईल आणि केतनला दरीत ढकलेल, असंही त्यांच्या प्लानमध्ये ठरल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र सियाचं खाली बसणं हा कही फक्त एक इशारा नव्हता, तर स्वत:ला वाचवण्यासाठी तिने केलेली युक्तीच होती. चेतनने ढकलल्यानंतर खाली पडताना स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात केतनने जर सियाला पकडलं असतं, तिचा हात धरला असता, तर ती देखील त्याच्यासोबत खोल दरीत पडू शकली असती, अशी भीती आरोपींना होती. म्हणूनच सियाला वाचवण्यासाठी ती खाली बसून, केतनपासून दूर राहील असं त्यांनी ठरवलं होतं. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, धक्का दिल्याच्या क्षणी काय घडू शकेल याचा सखोल विचार करूनच तयारी करण्यात आली होती.

स्कूटरवरून 90 किमी दूर पोहोचला चेतन

पोलिसांच्या तपासादरम्यान असंही निष्पन्न झालं की, चेतन चौधरी याने आपली ओळख लपवण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलली होती. टोल नाक्यांवर वाहनाची नोंद होऊ नये म्हणून, पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी त्याने कारऐवजी स्कूटरचा वापर केला. पोलिसांनी या घटनेत वापरलेली स्कूटरही जप्त केली आहे.

किल्ल्यावर पोहोचून बदलला वेष

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ल्यावर पोहोचल्यानंतर चेतनने आपलं रूपही बदललं. तो ‘हुडी’ घालून तिथे आला होता; त्यानंतर त्याने ती हुडी काढून आत घातलेला काळा टी-शर्ट उघड केला आणि परत येताना पुन्हा ती हुडी घातली. लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आणि आपली ओळख लपवण्यासाठीच त्याने असं केलं असावं, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

रविवारी पोलिसांनी सिया गोयलला लोहागड किल्ल्यावर नेले, जिथे एका डमीचा वापर करून संपूर्ण घटनाक्रम ( सीन रिक्रिएशन) पुन्हा उभा करून पाहण्यात आला. घटना नेमकी कशी घडली आणि आरोपींनी आपली योजना कशी अंमलात आणली, हे समजून घेणे हा यामागचा उद्देश होता.

आधीच केली प्रॅक्टिस

चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी हत्येपूर्वी योग्य ठिकाण शोधण्यासाठी किल्ल्याला भेट दिल्याची आणि योजना यशस्वी ठरेल याची खात्री करण्यासाठी सराव केल्याची कबुली दिली असा दावा पोलिसांनी केला. मात्र, हा सराव नेमका कुठे केला गेला, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना, पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यावेळी तपास पुढे नेण्यासाठी पोलीस कोठडीची मुदत वाढवून मागतील.

Follow Us