भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला NMCची मान्यता, महापौरांच्या प्रयत्नांना यश

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता मिळावी यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे प्रयत्न सुरु होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलंय.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला NMCची मान्यता, महापौरांच्या प्रयत्नांना यश
मुरलीधर मोहोळ
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 07, 2022 | 10:30 PM

पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpayee) वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical Collage) केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची (National Medical Commission) मान्यता मिळावी यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे प्रयत्न सुरु होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलंय. पुणेकरांसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. एनएमसीकडून प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

‘आणखी एक मानाचा तुरा; वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता! पुणेकरांसाठी आज आणखी एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आपल्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला आज एनएमसीकडून प्रवेश प्रक्रियेसाठीची अंतिम मंजूरी मिळाली. या अंतिम मंजुरीमुळे आपण 100 जागांवर प्रवेश करु शकणार आहोत. या मंजुरीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची साथ लाभली, समस्त पुणेकरांच्या वतीनं त्यांचे मन:पूर्वक आभार’, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.

महापौरांचा सातत्याने पाठपुरावा

मागील वर्षी जानेवारीमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली होती. त्यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले होते की, वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यासाठीचा शेवटचा टप्पा पार पडत असून विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याशी थेट आणि सविस्तरपणे चर्चा करता आली. आपल्या पुणे शहराच्या आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी हे वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरणारे आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या इतर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे, ही पुणेकरांसाठी समाधानाची बाब आहे’.

इतर बातम्या :

पुणे महापालिकेचं साडेआठ हजार कोटींचं अंदाजपत्रक, कोणत्या नव्या सुविधा मिळणार?

फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू