पुणे बलात्कार प्रकरण : पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक बाब समोर; एक नाही तर…

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे,  पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात  शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

पुणे बलात्कार प्रकरण : पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक बाब समोर; एक नाही तर...
| Updated on: Feb 26, 2025 | 9:32 PM

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे,  पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात  शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे, ससून रुग्णालयानं हा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पाठवला आहे.

वैदकीय अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे, या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पीडितेवर  एकदा नाही तर दोनदा लौंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांकडे पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणात   स्वारगेट आगाराच्या नियंत्रक मोहिनी ढेरेंची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून बस स्थानकात तोडफोड

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे,  तरुणीवर बसमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिवेसना ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्वारगेट बस स्थानकात घुसून तोडफोड करण्यात आली. सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नेमकं काय म्हणाले वसंत मोरे? 

मागच्या बाजुला चार एसटी बस उभ्या आहेत, या लोकांनी त्या बसला लॉज बनवले आहेत. त्या बसमध्ये बेडशीट, रग महिला भगिनींच्या साड्या आणि कंडोम सापडले आहेत. तुम्ही जर स्वत: जाऊन मीडियानं या सर्व गोष्टी पाहिल्या तर एसटीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे कंडोम पडलेले तुम्हाला दिसतील. या घटनेमध्ये या लोकांचा हात आहे, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा हात आहे.  बलात्कार घडला तेव्हा गाडी सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबीनसमोर उभी होती. मग ही घटना लक्षात कशी आली नाही, असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.