पुण्यात मृत्यूचे तांडव… मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, पोलिसांना थेट आदेश, म्हणाले, हयगय करू नका, कठोर…
गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने हाहाकार माजवला आहे. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही शहरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि एकाही आरोपीला न सोडण्याचे आदेश दिले आहेत

गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलं आहे. या दोन्ही शहरात विषारी दारूमुळे हाहाकार माझला आहे. एकामागून एक 14 लोकांचा या दारूमुळे मृत्यू झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. पोलिसांनीही या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर आले आहेत. फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत. हयगय करू नका. एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. दोन्ही पोलीस आयुक्तांना समन्वयाने काम करतानाच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. कोणाचीही हयगय करू नका. कठोर कारवाई करा, असे आदेशच दोन्ही पोलीस आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घ्यायलाही सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्य आरोपीसह अनेकांना अटक
या प्रकरणाचा समन्वयाने तपास सुरू आहे. अबकारी विभाग सुद्धा यात सहभागी झाला आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कर्नल विरखा सिंग हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर 8 जणांनाही अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर कठोर कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणात अजून अटक होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी रात्रभर दारूच्या अड्ड्यांवर छापेमारी केली आहे. आताही विषारी दारू कुठे बनली होती? याचा शोध घेतला जात आहे.