AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्र्यांना फोन केला तर फोन घेत नाहीत, एकनाथ शिंदेंच्या मुलासमोर शिवसेना आमदार जे आहे ते बोलला

भाषण सुरू असतानाच नगरसेवकांनी हात जोडून साहेब स्थानिकच उमेदवार द्या म्हणत विधान परिषदेला स्थानिक उमेदवाराची मागणी केली आहे. नगरसेवकाच्या मागणीनंतर आमदार संतोष बांगर यांनीही हात जोडून विनंती केली की "विधान परिषदेला उमेदवार स्थानिकच द्यावा.स्थानिकचा उमेदवार दिला तर पक्षाचं काम वाढेल ताकद वाढेल" अस ही बांगर म्हणाले

मंत्र्यांना फोन केला तर फोन घेत नाहीत, एकनाथ शिंदेंच्या मुलासमोर शिवसेना आमदार जे आहे ते बोलला
Eknath Shinde-Shrikant Shinde
| Updated on: May 29, 2026 | 11:48 AM
Share

शिवसेनेचे युवा नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात शिवसैनिकांची शिवसंवाद बैठक संपन्न झाली. बैठकीला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले, “येणाऱ्या 2029च्या विधानसभेला पुन्हा एकदा सन्मानीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या शिवाय राहणार नाहीत” आमदार संतोष बांगर हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरुन चर्चेत असतात. “2019 ला प्रकाश अबीटकर, मी सोबत होतो साहेब. आपण जर शिंदे साहेबांकडे आलो नसतो तर आपल्याला चांगलाच फटका बसला असता. येणाऱ्या विधानसभेला वसमत ,कळमनुरी ,हिंगोली ह्या तिन्ही विधान सभेत शिवसेनेचा भगवा फडकेल” असा दावा संतोष बांगर यांनी केला.

“नगरपरिषदेच्या निवडणुकी वेळी चांगल्या, चांगल्या धुरंधरांच्या सभा झाल्या या ठिकाणी. धुरंधरांच्या सभेला शहरातला एक माणूस /माय माऊली सुद्धा गेली नाही” असं संतोष बांगर म्हणाले. इथे देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. “काही मंत्री घोड्यावरून शेळ्या राखायलेत. फोन उचलत नाहीत. पहिल्या युवा सारखे तुम्ही नाहीत, तेव्हा सुद्धा मी आमदार होतो. जिल्हाप्रमुख होतो. एक ही फोन उचलत नव्हते” असा आदित्य ठाकरे यांच नाव न घेता टोला लगावला.

‘काही म्हातारे झाले त्यांना बाजूला सरकवा’

“आता श्रीकांत साहेबांना फोन केला, तर जोरदार प्रतिसाद असतो. बाकीच्या मंत्र्यांना फोन केला तर फोन घेत नाहीत.जास्त बोललो तर रताळाचा राक्षस होतो.जिल्हाप्रमुख पासून आमदार, मंत्र्यांनी पायाला भिंगरी लावून काम केले, तर येणाऱ्या विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकेल. काही म्हातारे झाले त्यांना बाजूला सरकवा आणि चांगली जबाबदारी द्या, त्यांना बाजूला करा ऐकू येईना,चालता येईना, बोलता येईना” असं संतोष बांगर म्हणाले.

माझ्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिफारस केलेली

“शेळ्या बाजूला करा. वाघ आहेत वाघांना जर पुढे केलं तर येणाऱ्या 2029 च्या विधानसभेला पुन्हा एकदा सन्मानिय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या शिवाय राहणार नाहीत” असा विश्वास संतोष बांगर यांनी व्यक्त केला.  2006 ला जिल्हाप्रमुख करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी माझी शिफारस केली होती असं ते म्हणाले.  “महायुतीचे सरकार कुणामुळे आला असेल तर शिंदे साहेबांमुळे आले. साहेब चेहरा शिंदे साहेबांचा होता. शिंदे साहेबांमुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आणि रक्षाबंधन साजरी झाली. तेव्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बसलं” असं संतोष बांगर म्हणाले.

Follow Us
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल.
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न......
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर..
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर...
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार.
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक.
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?.
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली.