AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RR Toss Controversy: राजस्थान गुजरात सामन्यात दोनदा टॉस, गिलच्या बाजूने कौल लागला होता; पण…

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत सुरू आहे. या सामन्यात दोन टॉस करावा लागला. पहिल्यांदा शुबमन गिलने नाणेफेक जिंकली होती. पण पुन्हा टॉस केला गेला. कारण की...

GT vs RR Toss Controversy: राजस्थान गुजरात सामन्यात दोनदा टॉस, गिलच्या बाजूने कौल लागला होता; पण...
GT vs RR Toss Controversy: राजस्थान गुजरात सामन्यात दोनदा टॉस, गिलने बाजूने कौल लागला होता; पण...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2026 | 8:07 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर शुबमन गिललाही प्रथम फलंदाजी करायची होती. पण कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागल्याने त्याला तसं करता आलं नाही. खरं तर या सामन्यात पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला होता. पण हा कौल अमान्य करण्यात आला आणि पुन्हा एकदा नाणेफेक करण्यात आली. हा कौल रियान परागच्या बाजूने गेला. पण दोनदा नाणेफेक करण्याची गरज का पडली? नेमकं पहिल्या टॉसवेळी काय झालं असे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला जाणून घेऊयात सर्व प्रश्नांची उत्तरं

दोन वेळा टॉस केला कारण की…

आयपीएल क्वॉलिफायर 2 सामन्यात पहिल्यांदा टॉस झाला तेव्हा तो रद्द करण्यात आला. कारण रियान पराने दिलेला कौल काही सामनाधिकाऱ्यांना ऐकू आला नाही. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी पहिला टॉस अमान्य करत रद्द केला. हा कौल शुबमन गिलच्या बाजूने लागला होता. पण दुसऱ्यांदा कौल झाला तेव्हा रियान परागच्या बाजूने कौल लागला. रियान परागने चूक न करता प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुल्लांपूर स्टेडियममधील खेळपट्टीच्या हिशेबाने हा निर्णय योग्यच होता. रियान परागने सुरुवातीला छापा (हेड्स) म्हटले, पण काटा (टेल्स) आला. त्यामुळे गुजरातने नाणेफेक जिंकली होती. पण सामनाधिकारी प्रकाश भट्ट यांनी ते ऐकले नाही. जेव्हा नाणेफेक पुन्हा घेण्यात आली, तेव्हा रियान परागने पुन्हा छापा (हेड्स) म्हटले आणि यावेळीही छापा आल्याने नाणेफेक जिंकली.

शुबमन गिल निराश होत म्हणाला की, आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. खेळपट्टीवर आधीच 40 षटकांचा खेळ झाला आहे आणि आम्हाला वाटले नव्हते की त्यात फारसा बदल होईल, पण दुर्दैवाने, मला वाटत नाही की पंचांनी रियानची सूचना ऐकली.’ शुबमन गिलला पुढचा प्रश्न विचारला गेला की, फायनलमध्ये जाण्याच्या संधीसाठी आजचा हा सामना खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा त्याने सांगितलं की, हो, नक्कीच, आमच्याकडे खेळण्यासाठी सर्वस्व आहे. आमच्यासाठी ही ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी परिस्थिती आहे आणि प्रत्येकजण पूर्ण जोशात आहे एक बदल, साई संघात परत आला आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा