AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

| Updated on: May 29, 2026 | 2:49 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं चित्र समोर आलं आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाविकास आघाडीने 17 पैकी 15 जागांवर एकमत साधल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या प्राथमिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं चित्र समोर आलं आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाविकास आघाडीने 17 पैकी 15 जागांवर एकमत साधल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या प्राथमिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र, नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर अद्यापही पेच कायम असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 8 जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेस चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर पोटनिवडणुकीची जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला 4 जागा आल्या असून रत्नागिरी, जळगाव आणि परभणी-हिंगोली या मतदारसंघांमध्ये ठाकरे गट उमेदवार देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 3 जागा आल्या असून पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या मतदारसंघांवर पक्ष दावा करणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “या निवडणुकीला आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार आहोत. उर्वरित दोन जागांबाबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर सन्मान्य तोडगा निघेल.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता उर्वरित दोन जागांवर कोणता पक्ष माघार घेतो आणि महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला काय ठरतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

Published on: May 29, 2026 02:49 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार