AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?

Chandrashekhar Bawankule meets Devendra Fadnavis: नागपूर आज राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज रामरक्षा आंदोलन होत आहे. त्यापूर्वी बावनकुळे हे फडणवीसांना भेटण्यासाठी रामगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. काय आहे मोठी घडामोड?

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?
चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Jul 18, 2026 | 10:38 AM
Share

Chandrashekhar Bawankule meets Devendra Fadnavis: नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन होत आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत मोठे दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होत असून पुढील राजकीय समीकरणांची चर्चा होत आहे. त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सकाळीच रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

जयंत पाटील अर्थमंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा होत आहे. जयंत पाटील हे राज्याचे नवीन अर्थमंत्री असतील असा दावा करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सतेज पाटील यांनी हा दावा फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या घडामोडी घडत असताना फडणवीस आणि बावनकुळे यांच्या भेटीला मोठे महत्त्व आले आहे.

ठाकरेंच्या आंदोलनावर बावनकुळेंची टीका

उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण हा केवळ ढोंगीपणा आहे. जनाधार कमी झाल्यामुळे त्यांना प्रभू श्रीराम आठवला. मतांची बँक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जनाधार गेल्यावर आता त्यांनी भूमिका बदलली आहे. प्रभू श्रीराम आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसून आस्था, संस्कार आणि संस्कृतीचे प्रतिक आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते. पण ते अयोध्येत आले नाही. आता वोट बँकेसाठी ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

फडणवीसांचा 22 जुलै रोजी वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. नागपूरमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. रामरक्षा आंदोलनाचे बॅनर लावण्यासाठी परिसरात जागा उरली नसल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तर राऊतांनी फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना रामरक्षा पठण करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यावरून भाजपच्या गोटातून हल्लाबोल सुरू झाला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे.

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?