AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?

NCP Sharad Pawar NDA: पावसाळी अधिवेशनापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार हे काय निर्णय घेणार याची महाराष्ट्रातच नाही तर भारतात चर्चा आहे. त्यांच्या एका निर्णयाने NDA ला मोठे बळ मिळू शकते. तर INDIA आघाडीला झटका बसू शकतो. पण पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे?

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?
आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद?
| Updated on: Jul 18, 2026 | 9:47 AM
Share

NCP Sharad Pawar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही सत्तेसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या 15 दिवसात राजकारण तापलेले आहे. सध्या तरी वेट अँड वॉचच्याच भूमिकेत पक्ष असल्याचे दिसते. NDA मध्ये सहभागी होण्याविषयी नकार देत असताचना भेटीगाठीच्या सत्रांनी मात्र संशयाचे धुके दाट केलेले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घाडमोडींवर बोलके भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट हा काही योगायोग नक्कीच नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व अगोदरच ठरलेले आहे. सरकारमधील काही लोकांनी मला सांगितले आहे की, शरद पवार यांचे खासदार पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतकेच नाही तर काँग्रेसचेही खासदार तोडण्याची शक्यता आहे असे चव्हाण यांनी दावा केला. आमदार रोहित पवार यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. पण राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. सध्याच्या भेटीगाठीच्या सत्राने त्याला हवा दिल्ली हे नक्की.

अगोदर राष्ट्रवादीचे विलिनीकरण आणि नंतर पुढील चर्चा

शरद पवार गट हा एनडीएमध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी भाजपकडून एक स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे कळते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, दोन्ही पक्षांचे विलिनीकरण व्हावे. त्यानंतरच एनडीएमध्ये सहभागी होता येईल असे भाजपने स्पष्ट केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यानुसार, दोन्ही स्वतंत्र राष्ट्रवादी ऐवजी विलिनीकरणानंतरच शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होता येईल.

विलिनीकरण झाले तरच एक-एक मंत्रीपद

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार राष्ट्रवादीने नवीन सूर आळवला आहे. 50 टक्के जागा फॉर्म्युल्यावर विचार होऊ शकतो, असे त्यांनी भाजपला कळवले आहे. या विधेयकावर INDIA आघाडीतील घटक पक्षांचे मन वळवलेही जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदार भाजपमध्ये विलीन होणार नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एनडीएसोबत राहतील आणि दोन्ही गटाला एक एक मंत्रिपद देण्यात येईल अशी चर्चा होत आहे. शरद पवार गटाचे लोकसभेत 8 खासदार आणि एक राज्यसभा खासदार आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी शरद पवारांच्या पाठिंब्याची गरज

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूरीसाठी केंद्र सरकाला शरद पवार यांच्या आठ लोकसभा खासदार आणि एका राज्यसभा खासदारांची मोठी मदत होईल. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी INDIA आघाडीत याविषयी अगोदर चर्चा होईल. एक सामूहिक निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडामोडींकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. पवार काय निर्णय घेतात यावर पुढील अनेक गणितं अवलंबून असतील.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...