AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तसेच त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले
| Updated on: Jul 18, 2026 | 12:11 PM
Share

दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीवरून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक हे गेल्या 20 दिवसांपासून आंदोलनाला बसले होते. परंतु आज दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोर्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईने जंतर-मंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ झालाय. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले, पाच-सहा दिवसांत अटक करतील, नेमकं तसं झालं आहे. त्यांची मागणी काय होती, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा… का तर…त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती. परंतु त्यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्यांच्या परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. आंदोलनातून मागणी होत आहे, तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. शेवटी त्यांच्या मागणीसाठी इतर राजकीय पक्ष देखील उभे राहिले’.

‘काँग्रेसच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी गेले. राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या. सर्व जण एक सामूहिक मागणी करत होते. हे आवाक्याच्या बाहेर गेल्याचं लक्षात आलं, त्यानंतर अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अटकसत्र झालं. बघुयात. सोनम वांगचुक यांना अटक जरी झाली, तरी आंदोलन सुरू राहणार. मागणी रास्त होती. विद्यार्थ्यांसाठी होती, असे शरद पवार यांनी सांगितले. 20 दिवसांत दिल्लीत असूनही तुम्ही भेटायला येत नाही. हे आंदोलन सुरूच राहील. या विषयानेच संसदेला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, ‘येत्या 20 तारखेला त्यांचा संसदेवर मार्च होणार होता. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना ताब्यात घेतलं असेल. ज्या पद्धतीने मोदी सरकार नवीन पिढीचं आयुष्य खराब करत आहे. त्यांनाही आताही नीटचे निकाल आले. त्याची मार्कशीटमध्येही घोळ आहे. तो नवा घोटाळा आहे. साध्या परीक्षा देखील सरकार पारदर्शक घेऊ शकत नाही. या नवीन पिढी बरबाद करत आहे. त्यामुळे ही पिढी उठली आहे. राहुल यांच्याही तरुणांसाठी सभा झाल्या. तरुणांच्या मनात राग आहे. तो राग वांगचुक यांच्या आंदोलनातून पुढे येत होते. नरेंद्र मोदी हे अमेरिकेला सरेंडर होतील. पण देशातील लोकांवर दडपशाही आणत आहे’.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा