AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव!; विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर

मोठी बातमी! नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव!; विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर

| Updated on: May 29, 2026 | 5:14 PM
Share

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान विषारी दारू तयार करण्यापासून ते विविध दारू अड्ड्यांपर्यंत तिचा पुरवठा कसा झाला, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान विषारी दारू तयार करण्यापासून ते विविध दारू अड्ड्यांपर्यंत तिचा पुरवठा कसा झाला, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती हा हातभट्टी दारू तयार करत होता. त्याच्याकडून योगेश वानखेडे हा दारू खरेदी करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अड्ड्यांवर विक्री करत होता. अधिक नफा कमावण्यासाठी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळल्याने ही दारू विषारी बनली.

ही दारू फुगेवाडीतील कर्नेलसिंह विरका आणि गुरमितसिंह विरका या बापलेकांच्या अड्ड्यावर विकली गेल्याचं समोर आलं आहे. तसेच खडकी, वडारवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातही या दारूचा पुरवठा करण्यात आला होता.
या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Published on: May 29, 2026 05:14 PM

Follow Us
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..