AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj jarange Patil : एकनाथ शिंदेंसंदर्भातल्या त्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचं उपरोधिक उत्तर, मग त्यांचं बरोबर आहे..

Manoj jarange Patil : प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाहीत, ते गेल्याने प्रश्न सुटणार नाहीत असं अंबादास दानवे म्हणतात. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मला कशाला पडायचय त्यातं. तो त्यांचा राजकीय मुद्दा आहे.

Manoj jarange Patil : एकनाथ शिंदेंसंदर्भातल्या त्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचं उपरोधिक उत्तर, मग त्यांचं बरोबर आहे..
Manoj jarange Patil-Eknath Shinde
| Updated on: May 29, 2026 | 10:37 AM
Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील येत्या 30 मे पासून आमरण उपोषण आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्याआधी 29 मे रोजी सरकारचं शिष्ट मंडळ त्यांची भेट घेऊ शकतं. मनोज जरांगे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. “सरकारच्या शिष्टमंडळाची रुपरेषा कशी आहे हे मला माहित नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार. 29 मे पूर्वी सर्व मागण्या मान्य करा असं आम्ही सांगितलं होतं. आश्वासन नको बाबा. आश्वसानवर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे का? उपोषण फायनल आहे. आधी तीन वर्ष, आता 10 महिने थांबलो आहे” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

एकनाथ शिंदे साहेब म्हणाले सरकार सकारात्मक आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील उपरोधिकपणे बोलले. “कुठे 10 महिन्यात काहीच सकारात्मक दिसलं नाही. 10 महिने गेले, मराठ्याचं वाटोळं झालं. याला ते सकारात्मक म्हणत असेल तर ते खरं आहे. मराठ्याच्या पोराचं वाटोळं झालं. सारथी अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला” असं मनोज जरांगे म्हणाले. “मराठ्यांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. मराठ्याच्या पोरांनी बलिदान दिलं, त्यांना निधी दिला नाही, नोकऱ्या दिल्या नाहीत. याला सरकार सकारात्मक म्हणत असेल तर ते बरोबर आहेत. गॅझेट काढलं पण प्रमाणपत्र दिलं नाही. ते म्हणाले 58 लाख कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी निघाल्या पण व्हॅलिडिटी दिली नाही. आमच्यासाठी सरकार कुठे दिसतच नाही. आमचं सगळं वाटोळं झालं. 10 महिने झाले. वेळ देऊनही पाऊल उचललं नाही” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मला कशाला पडायचय त्यातं

प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाहीत, ते गेल्याने प्रश्न सुटणार नाहीत असं अंबादास दानवे म्हणतात. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मला कशाला पडायचय त्यातं. तो त्यांचा राजकीय मुद्दा आहे. ते परस्परांना उत्तर देतील” “जातीवंत असो वा श्रीमंत, गरीब मराठा मी सर्वांसाठी लढतोय. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षातल्या मराठ्यांसाठी मी झटतोय. त्यांचे कार्यकर्ते मराठा आहेत. लेकी बाळीच्या कल्याणासाठी झटतोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हाद
पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हाद.
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.