AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील त्या थराराक व्हिडीओनंतर धक्कादायक माहिती पुढे, दोन सख्ख्यी चुलत भावंडेच…

पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली असून याबद्दल धक्कादायक अशी माहिती पुढे येताना दिसतंय. हा अपघात इतका जास्त भयंकर होता की, काही क्षणात सर्वकाही संपले. पोलिस या प्रकरणात तपास करत असून मोठा संशय व्यक्त केला जातोय.

पुण्यातील त्या थराराक व्हिडीओनंतर धक्कादायक माहिती पुढे, दोन सख्ख्यी चुलत भावंडेच...
Pune Koregaon Park accident
| Updated on: Nov 02, 2025 | 2:09 PM
Share

पुण्यात पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर जागीच दोन जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे सख्ख्या चुलत भावांचा जीव गेला. या अपघाताचा व्हिडीओही पुढे आला असून हा अपघात किती जास्त भयंकर आहे, हे स्पष्ट दिसतंय. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. मेट्रो स्टेशनजवळ भरधाव वेगाने कारने खांबाला धडक दिली. अपघाताबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या अपघाताबद्दल बोलताना म्हटले की, पहाटे 4.55 हा अपघात घडला. मयत दोन्ही मुले पिंपरीची आहेत. जखमी विद्यार्थी एमआयटीच विद्यार्थी असून तो मूळ बीडचा आहे.

मोबाईल फोन मिळाले आहेत, तपास सुरू आहे CDR काढत आहोत. गाडीचा नंबर मिळाला आहे, तसा डिटेल्स तपास केल्या जात आहेत. अपघात झाला त्याठिकाणी बिअर बाटली मिळाली आहे, त्याचाही तपास सुरू आहे. मुलांनी अपघाताच्या अगोदर मद्यप्राशन केलं होतं का याचा देखील तपास सुरू आहे. काल रात्री आम्ही पार्टीला जाणार आहोत अस मयत मुलाने त्याच्या आईला सांगितलं होत त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क अपघातात सख्ख्या दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मृत ऋतिक भंडारी आणि यश भंडारी हे गाडीत पुढच्या सीटवर बसले होते तर कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी झाला. गाडीचा हँड ब्रेक ओढल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिल्लरला जाऊन धडकली. गाडीचा वेग अधिक असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

एम.एच. 24 डीटी 8292 गाडी काळ्या रंगाची गाडी असून गाडी भाड्याने घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पुणे पोलिसांकडून गाडी नेमकी कुठून आली याचा शोध घेतला जातोय. रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू केलं आहे. थोड्याच वेळात फॉरेन्सिक टीम अपघातस्थळी दाखल होणार आहे. अपघातातील गाडीत अल्कोहोल किंवा नशाली पदार्थ होते का याची तपासणी केली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...