राज्य सरकार रेव्ह पार्टीमधूनच निर्माण झालंय; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल

Sanjay Raut on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : नरेंद्र मोदी म्हणतात, आधी गुजरातचा विकास... मग देशाचा विकास. आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी असं भाष्य केलं नव्हतं. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत, असा घणाघातही संजय राऊतांनी केला आहे.

राज्य सरकार रेव्ह पार्टीमधूनच निर्माण झालंय; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 11:26 AM

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 31 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आज ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचं राज्य सरकार रेव्ह पार्टी मधूनच निर्माण झालं आहे. गुजरातमधून अमली पदार्थ येत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या ड्रग्स रॅकेट गुजरात कनेक्शन आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

महाराष्ट्रामधून 17 प्रकल्प राज्या बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. दहशतीखाली महाराष्ट्रातील उद्योगपतींना घेऊन चालले आहेत. मुंबईची वाट लावण्याचं धोरण हे सरकार करत आहे. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे यांच्यात ताकद नाही की उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलावं. नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनामध्ये होते ना, तर त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे नाव सांगता मग सांगा ना की राज्यातून एक ही प्रकल्प बंद होऊ देणार नाही म्हणून… सगळ्यांनी ओवाळणी बंद करावी. शिवसेनेत आम्ही नाते गोती तोडली ना पण आमचे उद्धव ठाकरे उभे आहेत आणि लढत आहेत, असंही राऊत म्हणाले.

मोदी बागेत ‘ती’ भेट झाली?

पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाल्याची चर्चा आहे. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर सकारात्मक आहेत. हुकुमशाही बदलून टाकण्यासाठी ते ठाम आहेत. आंबेडकर यांच्या सभा बघितल्या असतील. तर ते लढाईमध्ये उतरले आहेत. सामंजस्य पणे ते भूमिका बजावत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

जागावाटपावर राऊत म्हणाले…

लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये जिंकेल त्याची जागा, या फॉर्म्युल्यावर काम करत आहे. जयंत पाटील यांनी शिवसेनेशी चर्चा केली आहे. जागा वाटपाचा संदर्भात आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मुंबईत कोण काय बोलतात यावर जाऊ नका, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.