वटपौर्णिमेला माहेरी गेलेल्या 26 वर्षीय महिलेसोबत भावानेच केले मोठे कांड, थेट पोलिसात धाव, बेडरुममध्ये..
माहेर म्हटले की, प्रत्येक महिलेचे आवडते ठिकाण असते. माहेरच्या माणसांबद्दल प्रेम, जिव्हाला आणि आपुलकी कायमच असते. माहेरचे नाव जरी कानावर पडले तरीही महिलांना आनंद होतो. मात्र, एक महिला माहेरी गेली आणि तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली.

माहेर म्हटले की, प्रत्येक महिलेसाठी जगातील आवडते ठिकाण असते. जगातील कोणत्याही ठिकाणी ती जेवढी आनंदी इतर कुठेही राहू शकत नाही, तेवढी ती आपल्या माहेरी आनंदी आणि सुखी असते. महिलेला आस असते की, मी कधी माझ्या माहेरी एकदाची काही दिवस राहिला जाईल. लेक कितीही मोठी झाली तिला लेकरं झाली तरीही ती आपल्या आई वडिलांसाठी लहानच असते. वर्षातून काही महत्वाच्या सणांची महिला आवडीने वाट पाहत असतात, कारण माहेरी जाण्याची हीच संधी असते. कोणत्याही दडपणाशिवाय महिला माहेरी आरामात राहू शकते. मात्र, माहेरचीच लोक घात करू शकतात, यावर कोणत्याही महिलेचा विश्वासच बसणार नाही. मात्र, अशी एक धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. चक्क एका भावानेच बहिणीचा घात केला आणि मोठे कांड केले.
महिला वटपौर्णिमेच्या सण साजरी करण्यासाठी आपल्या माहेरी आली. ज्यावेळी ती माहेरात आली, ज्यावेळी ती प्रचंड आनंदात होती. तिने आपल्यासोबत असे काही होईल, याचा साधा विचारही केला नव्हता. मात्र, तिच्यासोबत असे काही घडले की, तिला थेट पोलिसात धाव घ्यावी लागली. महिलेने बेडरूममध्ये एका पर्समध्ये आपले तब्बल साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने कपाटाजवळ ठेवली.
त्यानंतर अचानक ते दागिने गायब झाली आणि महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली. लोणीकंद पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने आपल्या सख्य्या भावावर संशय घेतला. कारण बाहेरचा कोणीही व्यक्ती घरात आलाच नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथे राहणारी 26 वर्षीय महिला वटपौर्णिमेनिमित्त पेरणे फाटा येथे आपल्या माहेरी गेली होती. यादरम्यान तिने आपले सोन्याचे दागिने एका पर्समध्ये ठेवली होती.
माहेरी पोहोचल्यानंतर तिने आपल्या पर्समधील दागिने तपासले आणि बेडरूममधील कपाटाजवळ ठेवली. मग काय माहेरी गेल्यावर महिला मस्त गप्पा, गोष्टी खाणे पिणे यात दिवसभर रमली. त्यानंतर तिने रात्रीच्या वेळी आपली पर्स बघितली असताना दागिने थेट गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. यादरम्यान तिने अजिबात वेळ घातला नाही आणि लोणीकंद पोलिस ठाणे गाठले. धक्कादायक बाबत म्हणजे तिने थेट आपल्या भावासोबतच भावजईवर संशय व्यक्त केला. पोलिसांकडून या प्रकरणाची चाैकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणाने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.