AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! एरिया 37 आणि कपडे… केतन अग्रवाल प्रकरणात सियाची बोलतीच बंद; पोलिस थेट घरात…

Ketan Agarwal Case: पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. पोलिस थेट सियाच्या घरी पोहोचले आहेत.

Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! एरिया 37 आणि कपडे... केतन अग्रवाल प्रकरणात सियाची बोलतीच बंद; पोलिस थेट घरात...
सिया गोयलImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 2:35 PM
Share

लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन धकलून व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या करण्यात आली. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या बॉयफ्रेंड चेतन चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. आता या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. सियाने जे काही केलं ते आता उघड झाले आहे.

थेट सियाच्या घरी पोहोचले पोलिस

समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयलला पोलिस तिच्या घरी घेऊन गेले आहेत. घटनेनंतर आरोपीच्या उपस्थितीत पंचनामा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस सियाच्या घरी पोहोचले आहेत. तेथे पोहोचल्यानंतर सियाचे कपडे, मोबाईल, इतर गोष्टींचा पंचनामा करण्यात आला. १८ जून रोजी घटना घडल्यावर सिया ने कुठले पुरावे नष्ट केले का? याचा तपास करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडेसुद्धा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहेत.

एरिया ३७ च्या मागील बाजूस…

पुण्यातील एरिया ३७ च्या मागील बाजूस टेकडीवरून सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडावर धक्का कसा द्यायचा याचा सराव केला होता. पुण्यातील तीन ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आज सियाला पंचनामा करण्यासाठी घेऊन आले होते. 18 जून रोजी केतन अग्रवाल खून प्रकरणात अटक असलेली आरोपी सिया गोयलला घेऊन आज पुणे ग्रामीण पोलिसांनी घटने पूर्वी आणि घटनेनंतर सिया ज्या ज्या ठिकाणावर गेली होती तिथे पंचनामा केला आहे.

सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी ज्या ठिकाणी केतनला मारण्यासाठी सराव केला होता तिथे सुद्धा भेट दिली आणि पंचनामा केला आहे. पुण्यातील एरिया ३७ च्या मागील बाजूस टेकडीवरून सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सराव केल्याची माहिती मिळतेय. पुणे ग्रामीण पोलिस या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या भूमिकेचा सखोल तपास करत आहेत. आरोपीला घटनास्थळी आणि संबंधित ठिकाणी नेऊन पंचनामा करणे हा तपासाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. सियाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यांची फॉरेन्सिक तपासणीही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपासातील नवीन माहिती

पुणे पोलिसांनी शुक्रवारी आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याची सुमारे १० तास चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल चेतन चौधरीला ओळखतो. त्याने सांगितले की, चेतन आणि सियाची मैत्री क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती.

Follow Us
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?