AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवलं

पुणे पुन्हा हादरल आहे. जुन्नरच्या आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे.

पुणे हादरलं! आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवलं
pune junnarImage Credit source: tv9
| Updated on: Aug 19, 2026 | 10:02 AM
Share

पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.  एका आमदाराच्या गावात 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जुन्नर हादरलं आहे. या संतापजनक घटनेने संपूर्ण गाव पेटून उठलं आहे. काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्येही अशीच क्रूर घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला शेतात नेल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येने नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

जुन्नरच्या आमदारांच्या गावातच चिमुकली राहायला होती. अवघ्या १० वर्षीय मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या तरुणाची वाईट नजर पडली. त्याने या ओळखीचा गैरफायदा घेत शेतात नेलं. त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. आरोपीचं कृत्य पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेने नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

संतापजनक घटनेनंतर पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचून तातडीने सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. या प्रकरणाने जुन्नरमधील पिंपळवाडी परिसरात संतापाचं वातावरण तापलं आहे. आता या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून पीडित मुलीला न्याय द्यावा, अशी मागमी ग्रामस्थांनी केली आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच संताजपनक प्रकार घडला आहे.

तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील भोर तालुक्याच्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार घडल्याने खळबळ उडाली होती. काही महिन्यांपूर्वी आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीची अत्याचार करून हत्या केली होती. त्याने 1 मे 2026 रोजी हा गुन्हा केला होता. त्याच्या कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यानंतर पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलं. त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. नसरापूरनंतर आता जुन्नरमध्येही क्रर घटना घडली आहे.

Follow Us
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा