Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या ! जिल्ह्यात 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय;जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं ?

अपुऱ्या पावसामुळे राज्यात यंदा दुष्काळ आणि पाणी टंचाईचे संकट उभं राहिलं आहे. पुणे जिल्ह्यात 20% पाणी कपातीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवठा टिकवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. पाणी जपून वापण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या ! जिल्ह्यात 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय;जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं ?
| Updated on: Oct 15, 2026 | 4:04 PM

राज्यभरात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने भीषण दुष्काळाची स्थिती उद्भवली आहे. पावसाच्या अभावामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे संकट आ वासून उभं आहे. राज्याला पाणीपुरवठा करणारी जी धरणं आहेत, त्यातील पाणीसाठी पुढल्या पावसाळ्यापर्यंत टिकवण्याचं मोठं आव्हान सध्या समोर आहे. याच पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घेण्यात आले आहे. दरम्यान पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात पाणी कपात जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 20 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात घोषणा केली. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून, पाण्याचे योग्य नियोजन आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Loading...

राज्यभरातील अनके प्रमुख शहरांसह तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पाणी कपातीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातही पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. या परिस्थितीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याची नासाडी करू नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दर गुरूवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद

दरम्यान यापूर्वीच पुणे महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला होता. दर गुरवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आज म्हणजेच 15 ऑक्टोबरापासूनच हा निर्णय अमलात आणण्यात येणार आहे. पुढच्या वर्षभरासाठी उपलब्ध पाणी नीट वापरता यावं, त्याचं नीट नियोजन व्हावं आणि पाणीटंचाईचा धोका कमी व्हावा यासाठ हा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पुणेकरांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आवश्यक तेवढंच पाणी वापरावं, असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं.

त्यातच आता पुणे जिल्ह्यात 20 टक्के पाणी कपात जारी करण्यात आल्याने नागरिकांना आणखीनच जपून पाणी वापरावं लागणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us