Rohit Pawar : महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते, पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार रोहित पवारांकडून उघड

Rohit Pawar : "या प्रकरणात दोन कंपन्या आहेत. विद्यापीठाच्या मालकीच्या कंपन्या असल्या तरी त्यात भाजप विचाराचे लोक भरले आहेत. राजेश पांडे नावाचा व्यक्ती आहे त्याचा वावर विद्यापीठात असतो. तो भाजपचा आहे. त्याचा काय कंट्रोल आहे?"

Rohit Pawar : महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते, पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार रोहित पवारांकडून उघड
Rohit Pawar
| Updated on: Jul 30, 2026 | 12:21 PM

सध्या पेपर फुटीचे प्रकार सुरु आहेत. परीक्षा व्यवस्थेत गोंधळाची स्थिती आहे. याविरुद्ध देशातील विविध भागात आंदोलनं सुरु आहेत. नीटचा पेपर फुटल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशातच आता पुणे विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे विद्यापाठातील एका कर्मचाऱ्याने एका विद्यार्थ्याला 70 हजार रुपयात पदवी प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या मुद्यावर एक्सवर एक पोस्ट केली आहे. “पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला? महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते. उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…!” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. या प्रकरणातील आरोपी रमेश मुखेकर याला निंलबित केलं आहे.

“कुलगुरूंना संघटनेने पत्र दिलं आहे. विद्यापीठात घोटाळा सुरू आहे. पैसे घेऊन पदवी दिली जात आहे असं सांगितलं होतं. कदम यांनी न घाबरता कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी वाचा फोडली. त्यांचं मन खात होतं. त्यामुळे त्यांनी गायकवाडांना भेटून भूमिका मांडली. एक महिना आधी पत्र देऊनही त्यावर कारवाई झाली नाही. मीडिया आणि राजकीय नेत्यांनी विषय उचलला त्यामुळे विद्यापीठात खळबळ उडाली” असं रोहित पवार म्हणाले.

या व्यक्तीचा मोबाईल चेक करावा

“रमेश मुखेकर याला निलंबित केलं. पण एवढ्यावर चालणार नाही. एक पदवी समोर आली. याचा अर्थ अनेक पदव्या दिल्या असतील. त्यामुळे या व्यक्तीचा मोबाईल चेक करावा लागेल. व्हॉट्सअपची चॅट बघावी आहे. दुर्देवाने चॅट दोन वर्षापूरती असते. २०१६ पासून मुखेकर तिथे होता. त्यामुळे २०१५ पासून ते ऑडिट केलं पाहिजे. नव्या डिग्र्या कुणा कुणाला दिल्या त्याचा अभ्यास केला पाहिजे” असं रोहित पवार म्हणाले.

म्हणजे हे रॅकेट मुखेकर पर्यंत थांबतं असं नाही

“एफआयआर झाला. मुखेकरला निलंबित केलं म्हणजे संपलं असं नाही. यात कोण कोण आहे हे पाहिलं पाहिजे. यात वरपासून कोण कोण आहे हे शोधलं पाहिजे. गायकवाड आणि कदम यांना निनावी फोन येत आहेत. त्यांना सांगत आहेत. म्हणजे हे रॅकेट मुखेकर पर्यंत थांबतं असं नाही” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

कुणा कुणाला डिग्री दिली ते तपासलं पाहिजे

“या प्रकरणात दोन कंपन्या आहेत. विद्यापीठाच्या मालकीच्या कंपन्या असल्या तरी त्यात भाजप विचाराचे लोक भरले आहेत. राजेश पांडे नावाचा व्यक्ती आहे त्याचा वावर विद्यापीठात असतो. तो भाजपचा आहे. त्याचा काय कंट्रोल आहे. याचा शोध घेतला पाहिजे. मुखेकरांकडून डीग्री दिली जात असेल तर त्याचा खोलात तपास केला पाहिजे. एका अधिकाऱ्यावर कारवाई करून चालणार नाही. कुणा कुणाला डिग्री दिली ते तपासलं पाहिजे”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us