AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी ! आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, ‘या’ दिवशी येणार नाही पाणी

पुणे महानगरपालिकेने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होईल. पुढील वर्षभरासाठी पाण्याच्या नियोजनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी ! आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, 'या' दिवशी येणार नाही पाणी
| Updated on: Oct 12, 2026 | 9:41 PM
Share

प्रदीप कापसे , रिपोर्टर : प्रदीप कापसे , रिपोर्टर : पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला असून, येत्या १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील वर्षभरासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे आणि पाणीटंचाईचा संभाव्य धोका कमी करता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाण्याचा वापर अधिक काटकसरीने करावा लागणार आहे.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले, त्याचा परिणाम आगामी काळातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करतात, त्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे धरणांमधील जलसाठ्यात घट झाली आहे. उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी आणि संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.  याच पार्श्वभूमीवर, पुणे महापालिका हद्दीत 15 ऑक्टोबरपासून प्रत्येक गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजनेतून पाण्याची बचत करून उपलब्ध जलसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महापालिकेचे आवाहन

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पुणेकरांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय. आगामी काही महिन्यांत पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक आणि खासगी वॉशिंग सेंटरमधील पाण्याच्या वापरावरही निर्बंध घातले आहेत. वाहने धुण्यासाठी तसेच अंगण आणि पदपथ स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, खासगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूल तसेच मनोरंजनाच्या कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान