AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMRDAवर तक्रारींचा पाऊस! विकास आराखड्यावर आतापर्यंत 26 हजार तक्रारी, 16 सप्टेंबरपर्यंत मुदत

पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाने (PMRDA) 2 ऑगस्टला प्रदेश क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा (Development Plan) जाहीर केला. त्यानंतर पीएमआरडीएने या विकास आराखड्यावर हरकती मागवल्या होत्या. मात्र, महिनाभरातच विकास आराखड्यावर तब्बल 26 हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे.

PMRDAवर तक्रारींचा पाऊस! विकास आराखड्यावर आतापर्यंत 26 हजार तक्रारी, 16 सप्टेंबरपर्यंत मुदत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा
| Edited By: Ajinkya Guthe | Updated on: Sep 02, 2021 | 9:29 AM
Share

पुणे : पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाने (PMRDA) 2 ऑगस्टला प्रदेश क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा (Development Plan) जाहीर केला. त्यानंतर पीएमआरडीएने या विकास आराखड्यावर हरकती मागवल्या होत्या. मात्र, महिनाभरातच विकास आराखड्यावर तब्बल 26 हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (26,000 complaints have been lodged on the development plan of PMRDA)

हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी मुदतवाढ

पीएमआरडीएने विकास आराखडा जाहीर केल्यापासूनच त्यावर अनेक भागात आक्षेप घेतला जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात पीएमआरडीएच्या विकास आराखड्यावर आणि जागांवर टाकलेल्या आरक्षणाविरोधात रोष आहे. पीएमआरडीएने चुकीच्या पद्धतीने जमिनींवर आरक्षण टाकल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या मेलवर अक्षरशः तक्रारींचा पाऊस आल्याचं चित्र आहे. विकास आराखड्याबाबत अनेक आक्षेप व्यक्त होत असताना तक्रार करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणीही जोर धरत होती. त्यानुसार तक्रार करण्यासाठी 30 ऑगस्टची मुदत वाढवून 15 सप्टेंबर करण्यात आली आहे.

‘अभ्यास न करताच चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलं’

प्रारूप विकास आराखड्यात जिल्ह्याच्या चारही बाजूच्या 18 झोनमध्ये 233 गावांवर पीएमआरडीएने फोकस केला आहे. ही 18 सेंटर्स जिल्ह्याचं ग्रोथ सेंटर ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. यात नागरीकरणासाठी 163.3 चौरस किमी क्षेत्र आहे. असं असलं तरी दुसरीकडे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास न करताच चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलं असल्याचं आरोप करण्यात येत आहे.

विकास आराखड्यावरच्या तक्रारी वाढत आहेत

या चुकीच्या आरक्षणाबाबत जिल्हा परिषदेत ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तो बहुमताने पारितही करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे ज्या निवासी क्षेत्रात लोक राहतात तिथे ग्रीन झोन म्हणजेच वनीकरणाचे आरक्षण टाकण्यात आलं आहे. तर जिथे ग्रीन झोन आहे तिथे औद्योगिक क्षेत्राचे आरक्षण टाकण्यात आलं आहे. अनेक गावांत तर डोंगर उतारावर शेतीचं आरक्षण टाकण्यात आलं आहे. त्यामुळे विकास आराखड्यावरच्या हरकती तक्रारी वाढत जात आहेत.

कशा आणि कुठे दाखल कराल हरकती आणि सूचना?

प्राधिकरणाच्या औंध कार्यालयासह आकुर्डी कार्यालय (नवीन प्रशासकिय इमारत पिपरी चिंचवड प्राधिकरण), वाघोली क्षेत्रीय कार्यालय, नसरापूर क्षेत्रीय कार्यालय, वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय इथं हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने लिखित स्वरूपात हरकती आणि सूचना देता येणार आहेत.

कुठे पाहता येईल विकास आराखडा?

पुणेकरांना पीएमआरडीएच्या औंध इथल्या महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन इथल्या कलादालनात हा विकास आराखडा उलपब्ध करून देण्यात आला आहे. सोबतच पीएमआरडीएच्या www.pmrda.gov.in या वेबसाईटवरही विकास आराखडा पाहता येईल. यासोबतच आता प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी सर्व तहसिल कार्यालयांमध्ये विकास आराखड्याचे नकाशे लावले आहेत. तसेच हरकती नोंदवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

इतर बातम्या :

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयची अटक

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

जात पंचायतीकडून घटस्फोट का घेतला नाही? वाळीत टाकल्याने पुण्यात तरुणाची पोलिसात धाव

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...