पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहण प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अजून करारा जवाब मिळेल आम्ही जगदीश मुळीकांच आव्हान स्वीकारलंय त्यांनी सांगावं आम्ही कुठं यायचंय? महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती आहे . मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिला आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहण प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Pune PoliceImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 7:42 AM

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात , भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहण केल्याची घटना घडली.  या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media )व्हायराल झाले. या घटनेची दखल घेत डेक्कन पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हीडीओ क्लीप्सच्या (video clipsमाध्यमातून तिघांवर कारवाई केली आहे. 323, 354, 504 , 506 आणि कलम 34 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील तपास केला जाणार आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल. अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली आहे. काल स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनही करण्यात आले होते.

पोलिसांनी चोख काम केलंय

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हीडीओ सर्वत्र व्हायरल झालेले सर्वांनी पाहिल्या . त्यानंतर शहर पोलिसांनी त्यांच काम चोखं केलंय. आणि तीन कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय. अशा आरोपींना वेळीच अटक होणं गरजेचं आहे. आम्ही पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केला. प्रशांत जगतापांनी मानले आभार इथून पुढे कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. अशी भावना वैशाली नागवडे यांनी व्यक्त केलीये.

करारा जवाब मिळेल -रुपाली पाटील

हे सगळे विकृत लोक आहेत, देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे त्यांच त्यांना कळतं का? राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी आमच्या कार्यकर्त्यांना जाऊन घोषणाबाजी करा आणि मार खा, असा सांगितलं का? स्वतःच्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढे करता आणि इतरांच्या महिलांना मारहाण होते तेव्हा काय? असा विचारला सवाल आता गुन्हा दाखल झालाय अटक कारवाई करा आता ही सुरुवात आहे. अजून करारा जवाब मिळेल आम्ही जगदीश मुळीकांच आव्हान स्वीकारलंय त्यांनी सांगावं आम्ही कुठं यायचंय? महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती आहे . मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.