AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात खळबळ! कॅबिनेट मंत्र्याच्या PAचा पत्नीवर जिवघेणा हल्ला, भांडण सोडवायला गेलेल्या पोटच्या मुलालाही बॅटने झोडले

या प्रकरणातील संशयित आरोपी एका कॅबिनेट मंत्र्याकडे खासगी स्वीय सहाय्यक तसेच ओएसडी (OSD) म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरण पोलिसांचा तपास सुरु आहे.

पुण्यात खळबळ! कॅबिनेट मंत्र्याच्या PAचा पत्नीवर जिवघेणा हल्ला, भांडण सोडवायला गेलेल्या पोटच्या मुलालाही बॅटने झोडले
पुणे क्राईमImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2026 | 12:10 PM
Share

राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यकाने (PA) आपल्या पत्नीचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे, आईला वाचवण्यासाठी गेलेल्या आपल्या चिमुरड्या मुलालाही या बापाने क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

विजय कारंडे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो एका कॅबिनेट मंत्र्याकडे खासगी स्वीय सहाय्यक तसेच ओएसडी (OSD) म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३० एप्रिल रोजी पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. विजय कारंडे हे घरी असताना मोबाईलवर कोणासोबत तरी चॅटिंग करत होते. पती कोणाशी बोलतोय, याबाबत पत्नीने सहज विचारणा केली. केवळ या साध्या विचारणेचा राग अनावर झाल्याने कारंडे यांनी पत्नीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

रागाच्या भरात कारंडे यांनी पत्नीचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आईला वाचवण्यासाठी त्यांचा लहान मुलगा मध्ये आला असता, संतापलेल्या विजयने मुलालाही सोडले नाही. त्याने चक्क क्रिकेटच्या बॅटने मुलाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलगा दोघेही जखमी झाले असून, पत्नीवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अहिल्यानगरमधून गुन्हा पुण्याकडे वर्ग

या घटनेनंतर पीडित पत्नीने सुरुवातीला अहिल्यानगर (अहमदनगर) येथे धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र, घटनेचे ठिकाण पुणे असल्याने हा गुन्हा आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात विजय कारंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुणे पोलीस आता या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का