Vidyanand Bapat Rap Song: ओ बापट… जाऊ द्या ना; विद्यानंद बापटांवरचं रॅप सॉन्ग चांगलंच चर्चेत

Vidyanand Bapat Rap Song: विद्यानंद बापट हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आता त्यांच्यावर आलेल्या एका रॅप साँगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे रॅप तुम्ही ऐकले का? एकदा नक्की ऐका...

Vidyanand Bapat Rap Song: ओ बापट... जाऊ द्या ना; विद्यानंद बापटांवरचं रॅप सॉन्ग चांगलंच चर्चेत
Vidyanand Bapat Rap Song
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 2:54 PM

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विद्यानंद बापट यांचे नावच चर्चेत आहे. गणेशोत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदीची मागणी करून त्यांनी वातावरण तापवले आहे. या भूमिकेमुळे त्यांना मारहाणही सहन करावी लागली, तरीही ते आपल्या विचारांवर ठाम राहिले आहेत. त्यांच्या या लढ्याला अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी काहींनी निषेधही व्यक्त केला आहे. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विद्यानंद बापट यांच्यावर आधारित एक रॅप सॉन्ग व्हायरल होत आहे.

काय आहे रॅप?

काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी विद्यानंद बापट यांच्यावर खास गाणे तयार केले होते, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आता मात्र त्यांच्या अस्खलित मराठी आणि डीजेविरोधी भूमिकेवर एक नवीन रॅप सॉन्ग समोर आला आहे. ‘ओ बापट… जाऊ द्या ना’ असे या गाण्याचे बोल असून त्यात बापट यांनी माध्यमांशी बोलताना उल्लेख केलेले ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम्…’ हे संस्कृत सुभाषितही समाविष्ट करण्यात आले आहे.

कोणी तयार केले हे गाणे?

दुबई येथील त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचे संस्थापक सागर पाटील या तरुणाने हे रॅप सॉन्ग तयार केले आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या आणि ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर आधारित हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विद्यानंद बापट केवळ डीजेविरोधी मागणीमुळेच नव्हे तर त्यांच्या अस्खलित मराठी भाषेमुळेही चर्चेत आहेत. अवधूत गुप्ते यांनीही त्यांच्या समर्थनार्थ एक गाणे गायले होते. त्यांनी तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सध्या महाराष्ट्रात विद्यानंद बापट यांच्याच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहेत. गणेशोत्सवात वाजणाऱ्या डीजेविरोधात त्यांनी एल्गार पुकारल्यामुळे त्यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. गणेशोत्सव आता दहा दिवसांवर आला असून त्यानंतर नवरात्रीसह एकापाठोपाठ अनेक सण होऊ घातले आहेत. त्यात डीजेचा वापर करण्याला बापट यांनी प्रखर विरोध केला असल्याने त्यांच्या आवाजामुळे वादाचा दणदणाट होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us