AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या एका व्हिडिओमुळे कंपनीला मोठा फटका ? थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण

अभिनेत्री नोरा फतेही एका विमान कंपनीच्या 3 कोटींच्या दाव्यामुळे चर्चेत आहे. गांधीनगर न्यायालयात दाखल झालेल्या या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या एका व्हिडिओमुळे कंपनीला मोठा फटका ? थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण
Nora Fatehi
| Updated on: Sep 08, 2026 | 3:18 PM
Share

Bollywood Actress Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्या एका वक्तव्यामुळे विमान कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आणि व्यवसायाचं नुकसान झालं, असा आरोप कंपनीने केला आहे. कंपनीने याप्रकरणी गांधीनगर न्यायालयात धाव घेत तब्बल 3 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हे प्रकरण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घडलं. नोरा फतेही हिने मुंबईहून जयपूरला जाण्यासाठी एक चार्टर्ड विमान बूक केलं होतं. या प्रवासादरम्यान तिने विमानातील व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या व्हिडिओमध्ये तिने त्या विमानाला ‘लेगो एअरप्लेन’ आणि ‘खेळण्याचे विमान’ असं म्हटलं, असा आरोप आहे.

अभिनेत्रीच्या या वक्तव्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचा दावा विमान कंपनीने केला. नोरा हिने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, त्याचा परिणाम फ्लाइट बुकिंगवरही झाला आणि काही बुकिंग रद्द करण्यात आली, असं कंपनीने म्हटलं. नोरा हिचं वक्तव्य अतिशय अपमानास्पद आणि बेजबाबदार असल्याचं कंपनीने म्हटलं. कोणतीही तांत्रिक माहिती नसताना विमानाबाबत अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात आलं, आरोपही कंपनीने केला.

25 सप्टेंबरला होणार सुनावणी

या प्रकरणी संबंधित कंपनीने याच वर्षी एप्रिल महिन्यात न्यायालयात धाव घेतली होती. आता कंपनीने नोरा फतेही यांच्याकडून 3 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. PTIच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 सप्टेंबर रोजी गांधीनगर न्यायालयात होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

नोरा फतेहीचं काम

दरम्यान, नोरा फतेहीच्या आगामी आणि अलीकडील प्रोजेक्ट्सचीही चर्चा सुरू आहे. ती याच वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट ‘KD: The Devil’ मध्ये दिसली होती. KVN प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात ध्रुव सरजा, शिल्पा शेट्टी, संजय दत्त आणि किच्चा सुदीप यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय नोरा फतेही ‘Side Heroes’ या आगामी चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अपारशक्ती खुराना, वरुण शर्मा, अभिषेक बॅनर्जी आणि रकुल प्रीत सिंग हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता होती. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...