Gautami Patil : गौतमी पाटील मोठ्या अडचणीत? पोलीस ठाण्यात थेट तक्रार दाखल; अश्लील डान्सचा मुद्दा पुन्हा तापला!
Gautami Patil Complaint : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील कथित अश्लील हावभाव, नृत्य आणि डायलॉगबाजीवरून भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘राजकीय म्हणून नाही, तर एक महिला म्हणून तक्रार करण्यासाठी आले आहे,’ असं पेंडसे यांनी म्हटलं आहे.

प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलविरुद्ध ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यामध्ये नुकताच दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राज्यात विविध मंचांवर गौतमी पाटीलसह इतरही नृत्यांगनांचं सादरीकरण हे वादात सापडलं. नेटकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. या सर्व प्रकाराला आता गंभीर वळण आहे. गौतमीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भाजपच्या नरगसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानी यासंदर्भातील एक व्हिडिओही पोलिसांकडे देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या नृत्यामुळे सामाजिक जीवनात विकृती वाढत असल्याचा दावा करत मृणाल यांनी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की ही तक्रार कोणत्याही राजकीय विरोधातून करत नसून एक महिला म्हणून दाखल करत आहे. दरम्यान, ठाणे पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी त्यांचं म्हणणं सविस्तरपणे मांडलं आहे.
“नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात बन्याच ठिकाणी कलाकारांना बोलवून जे काही नृत्य केले ते अतिशय अश्लील अशा प्रकारचे नृत्य केले गेले. त्याचा एक व्हिडिओ इथे मी जोडत आहे. एकीकडे आपण बघती, की समाजात विकृती पसरत आहे. लहान लहान मुलींवरती अत्याचार होतात आणि हे सगळं आजूबाजूला घडत असताना है अशा प्रकारचे ‘नाच होत असतील किंवा या अशा प्रकारच्या डायलॉगमुळे आपण या विकृतींना फोफावण्यासाठी आणखीन समर्थन देतोय असे माझे मत आहे.”, असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “तर अशा प्रकारच्या सार्वजनिक जागेवरून हे असं कृत्य करणाऱ्या या गौतमी पाटील हिच्यावरती आणि आयोजकांवर देखील गुन्हे दाखल व्हावेत अशी माझी मागणी आहे, याबाबतची तक्रार राज्य महिला आयोगालाही दिली आहे.
दरम्यान, कालच आणखी एका नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आाला होता. तिच्यावर पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात राधा पाटीलवर गुन्हा दाखल झाला. तसेच दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजक भूषण सोनवणे आणि अमोल काटे यांच्याविरोधातही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लावणीच्या नावाने अश्लील डान्स सादर होऊ नये म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्र दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी सादर करण्याची अट होती. तसं प्रमाणपत्र सादर न झाल्याने संबंधित मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नव्हती. तरी देखील हा कार्यक्रम आयोजित झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
