Pune accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ट्रकनं दिली दुचाकीला धडक; 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

| Updated on: Apr 27, 2022 | 2:38 PM

पिंपरीतील वल्लभनगर भागातील शेल पेट्रोल पंपाजवळ सकाळी 10 वाजता ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर (Sant Tukaram Nagar) भागात राहणाऱ्या 55 वर्षीय इक्बाल अब्दुल कादर यांनी फिर्याद दिली

Pune accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ट्रकनं दिली दुचाकीला धडक; 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
देशातील पहिला रॅपिड रेल्वे प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune road) रविवारी अपघात झाला. यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. पिंपरीतील वल्लभनगर भागातील शेल पेट्रोल पंपाजवळ सकाळी 10 वाजता ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. इंद्रजित कुमार संकेत (26) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव असून तो हिंजवडी येथील भूमकर चौकातील रहिवासी असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर (Sant Tukaram Nagar) भागात राहणाऱ्या 55 वर्षीय इक्बाल अब्दुल कादर यांनी फिर्याद दिली असून तो आपल्या नातवासोबत दुचाकी चालवत होता. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इझान शेख (10) असे मृताचे नाव असून तो आईच्या घरी जात होता. वाघमारे म्हणाले, की तो आजोबांसोबत अॅक्टिव्हावर बसला होता, तेव्हा ट्रकने दुचाकीला धडक दिली.

गुन्हा दाखल

दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकचालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ), 279 आणि 338 नुसार मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 119/177नुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Pune : कामावरुन काढल्याचा राग, मृत्यूचं कारण ठरली भयंकर आग! टेलरनं मालकिणीला पेटवलं, दोघेही ठार

Election : पुण्यातल्या भोरच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, वाचा सविस्तर

Pune fire incident : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्याजवळ ट्रक जळून खाक; कागदामुळे भडकली आग