Pune Crime : पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू?, नातेवाईकांचा रेल्वे पोलिसांवर गंभीर आरोप

न्यायालयानं त्याला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, नागेश आजारी पडला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला.

Pune Crime : पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू?, नातेवाईकांचा रेल्वे पोलिसांवर गंभीर आरोप
| Edited By: | Updated on: Aug 24, 2022 | 9:33 PM

पुणे : पुण्यात चोरीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागेश रामदास पवार असे या तरुणाचे नाव आहे. नागेश चोरीच्या आरोपाखाली काही दिवसांपासून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात होता. नागेश पवार (Nagesh Pawar) हा चोरीतील आरोपी आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी (railway police) त्याला 17 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने नागेशला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्या दरम्यान पोलिसांनी त्याला मारहाण केली. त्यात तो आजारी पडल्याने पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच नागेशचा मृत्यू झाल्याचा आरोप (serious allegations) त्याच्या परिवाराने केला आहे.

जबाबदार पोलिसांवर कारवाई व्हावी

नातेवाईकांनी केलेल्या या आरोपांमुळे रेल्वे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या नागेशचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये आहे. त्याचा मृतदेह ताब्यामध्ये घेण्यासाठी नागेशच्या नातेवाईकांनी आता विरोध केला आहे. या घटनेला जे पोलीस जबाबदार आहेत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई व्हावी. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यामध्ये घेणार नाही. अशा प्रकारची भूमिका आता नागेशच्या नातेवाईकांनी घेतलेली आहे. यामुळं हे प्रकरण आता चांगलेच तापले.

नेमकं काय घडलं?

पुणे रेल्वे पोलिसांनी नागेशला 17 ऑगस्ट रोजी अटक केली. न्यायालयानं त्याला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, नागेश आजारी पडला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला. परंतु, आता नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. मारहाण केल्यामुळं नागेशचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. यामुळं रेल्वे पोलिसांवर प्रश्न उपस्थित झालेत.