Pune Ajit Pawar : शाळा सुधार कार्यक्रमामुळे जि. प. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल, पुण्यात अजित पवारांनी व्यक्त केलं मत, अॅपचंही उद्घाटन

चांगल्या उपक्रमांची देवाण-घेवाणदेखील अॅपच्या माध्यमातून होऊ शकेल. अध्यापन साहित्य, नवीन अध्यापन पद्धती आदी माहिती मिळण्यासोबत डिजिटल लर्निंगसाठीच्या सुविधांचे मुल्यांकन आणि वापर करण्यासाठी अॅपचा चांगला उपयोग होणार आहे.

Pune Ajit Pawar : शाळा सुधार कार्यक्रमामुळे जि. प. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल, पुण्यात अजित पवारांनी व्यक्त केलं मत, अॅपचंही उद्घाटन
विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अजित पवार
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 4:12 PM

पुणे : शाळा सुधार कार्यक्रमामुळे शाळांमधील सुविधांचा दर्जा उंचावण्यासोबतच शिक्षणाचा दर्जाही उंचावण्यास मदत होईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे अॅपचे (Vinoba Bhave app) उद्घाटन अजित पवार यांच्याहस्ते पुण्यात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विधानभवन पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, संजय दालमिया आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, की शाळा सुधार कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेविषयी आकर्षण निर्माण होईल आणि पालकांचा जिल्हा परिषद शाळांवरील (ZP Scools) विश्वास वाढण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अध्यापन पद्धतीतही अनुकूल बदल घडवून आणता येतील.

जिल्हाभरातील शिक्षकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत

पुणे जिल्हा परिषदेत सेवा देणाऱ्या शिक्षकांसाठी आचार्य विनोबा भावे अॅप संजय दालमिया यांनी विकसित केले असून ते जिल्हा परिषदेला नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॅपअंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्हाभरातील शिक्षकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत होणार आहे. चांगल्या उपक्रमांची देवाण-घेवाणदेखील अॅपच्या माध्यमातून होऊ शकेल. अध्यापन साहित्य, नवीन अध्यापन पद्धती आदी माहिती मिळण्यासोबत डिजिटल लर्निंगसाठीच्या सुविधांचे मुल्यांकन आणि वापर करण्यासाठी अॅपचा चांगला उपयोग होणार आहे.

देऊ शकणार विविध उपक्रमांची माहिती

पुणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेला शिक्षकांना मार्गदर्शन, पाठ योजना तयार करणे, प्रशिक्षण सामग्री पद्धतशीरपणे सामायिक करणे आदींसह शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी अॅपचा उपयोग होईल. अॅपद्वारे प्रशासन माहिती संकलित करू शकते आणि शिक्षकांना विविध उपक्रमांची माहिती देऊ शकणार आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या हे अॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अजित पवार यांनीही या अॅपचे कौतुक करत याची उपयुक्तता यावेळी सांगितली.