अजितदादा महायुतीत का आले? अमित शाहांनी अखेर सांगितलं “ते” सीक्रेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांच्या महायुती प्रवेशाचे खरे कारण उघड केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला, असे शाह यांनी सांगितले. अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महायुतीला स्थिरता मिळाली. त्यांच्या कार्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. शाह यांनी अजितदादांच्या निधनाबद्दल दुःखही व्यक्त केले.

अजितदादा महायुतीत का आले? अमित शाहांनी अखेर सांगितलं ते सीक्रेट
amit shah
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 2:30 PM

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. अजितदादा महायुतीसोबत गेल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात आले होते. अनेक विश्लेषणं करण्यात आली होती. पण खरं कारण कुणीच सांगत नव्हतं. त्यामुळे अजितदादांनी एवढा मोठा निर्णय का घेतला? याचा सस्पेन्स आजही कायम आहे. मात्र, हा सस्पेन्स केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी अखेर संपवला आहे. अमित शाह यांनी अखेर ते सीक्रेट ओपन केलं आहे. अजितदादांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी अमित शाह यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अजितदादा महायुतीत कसे आले? याचा किस्साही सांगितला. अजितदादांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी तेव्हा दादांना विचारलंही. दादा तुमचं एक बॅकग्राऊंड आहे. तुमच्या या निर्णयाने जनतेलाही झटका लागेल. सर्वांना झटका लागेल. तुम्ही हा निर्णय का घेत आहात? सत्ता तर येते जाते. तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेत आहात? असा सवाल मी अजितदादांना केला. त्यावर दादांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. दादा म्हणाले, अमित भाई, प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचा विकास आणि महायुती दोघांना वेगळं करता येत नाही. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाशी जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे मला महायुतीचं सदस्य व्हायचं आहे, असं अजितदादा म्हणाले होते, असं अमित शाह यांनी सांगितलं.

Loading...

थोडा लेट झाला, पण…

अजितदादांना महायुतीत यायला थोडा लेट झाला. महायुतीत येण्याचे त्यांचे दोन तीन वेळा प्रयत्न अयशस्वी झाले होते. पण ते असतानाच एनसीपी महायुतीत आली. त्यानंतर माझी त्यांच्याशी घनिष्ट मैत्री झाली होती. महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी एनसीपीच्या कार्यकर्त्यांसाठी माझ्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संयमाने वाद घातले होते. कार्यकर्त्यांसाठी भांडणारा, असा नेता वेगळाच असतो. जेव्हा लोकं मोठ्या पदावर बसतात तेव्हा एकमेकांच्या हिताचा आणि संबंधाचा विचार करतात. पण दादाने नेहमी एनसीपी कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या नात्याचा विचार करायचे. एक कार्यकर्ता म्हणून दादांकडे हा मोठा गुण होता, असं शाह यांनी स्पएष्ट केलं.

महायुतीत स्थिरता आली

दादा आल्यामुळे महायुतीत स्थिरता आली. निरंतरता आली. महायुती कठोर निर्णय घेऊ शकली. महाराष्ट्राचं सरकार चांगलं चाललं. दुर्देवाने दादा आपल्यातून अचानक गेले. सकाळी 8 ते 8.30 वाजता फडणवीस यांचा मला फोन आला. त्यांनी दुर्देवी घटनेची माहिती दिली. जखमी लोकांची वाचण्याची शक्यता कमी आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस रुग्णालयाच्या संपर्कात होते. त्यानंतर दादा गेल्याचं दोन तासात समजलं. या घटनेने केवळ मनालाच झटका बसला नाही, तर शरीर आणि हृदयही कापलं. असा नेता अशा विचित्र दुर्घटनेत जाईल असं वाटलं नव्हतं. काम करणारा माणूस वेळेच्या आधीच गेला. ही फार मोठी हानी आहे, असं ते म्हणाले.

दादांची आदर्श कार्यप्रणाली

संवेदनशीलपणे काम करणं, लोकांसोबत संवेदनशील असणं. प्लानिंग करून काम करणं, शिस्तीत काम करणं आणि वेळेची मर्यादा पाळून करणं ही कार्यपद्धती दादांनी तयारी केली आहे. राजकारणातील तरुणांसाठी त्यांची ही कार्यपद्धती आदर्शवत ठरणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us