साताऱ्यातील अंगापूर तर्फ तारगावमध्ये महिलाराज, ज्येष्ठ नागरीक आणि तरुणाईचा निर्धार

| Updated on: Jan 15, 2021 | 8:04 PM

सातारा तालुक्यातील अंगापूर तर्फ तारगावच्या ग्रामस्थांनी ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतलाय. (Angapur Tarf Targaon)

साताऱ्यातील अंगापूर तर्फ तारगावमध्ये महिलाराज, ज्येष्ठ नागरीक आणि तरुणाईचा निर्धार
अंगापूर तर्फ तारगाववर महिलाराज
Follow us on

सातारा: सातारा तालुक्यातील अंगापूर तर्फ तारगावच्या ग्रामस्थांनी ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे अंगापूर तर्फ तारगावचा कारभार महिलांच्या हाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत झाला. सातारा तालुक्यातील अंगापूर तर्फ तारगाव ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते. अंगापूर तर्फ तारगावची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेतला आहे. (Angapur Tarf  Targaon Gram panchayat will elect unopposed with all woman representatives)

ग्राम पंचायतीमध्ये महिलाराज

अंगापूरच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 9 महिलांची निवड केली आहे. त्या सर्व महिलांचे अर्ज छाननीत वैध ठरल्यानं ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीचा कारभार महिला पाहणार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. अंगापूर तर्फ तारगावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचं पंचक्रोशीतील गावांमधून कौतुक करण्यात येत आहे.

निवडणुकीचं वारं पण ज्येष्ठ आणि तरुणाईची समंजस भूमिका

गेल्या सहा महिन्यापासून गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी गटातटाचे राजकारण सुरू होते. यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होईल असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, निवडणुका जाहीर होताच सुज्ञ ग्रामस्थांनी बैठक घेतली. यामध्ये गाव पातळीवरील निवडणुकीतून राजकीय इर्षेपाई होणाऱ्या परिणामांची जाणीव करुन देण्यात आली. गावच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याची साद घातली गेली. याला प्रतिसाद देत गावातील मान्यवर ज्येष्ठ मंडळी आणि तरुण युवकांनी ही निवडणूक बिनविरोध साठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना यश येऊन नऊ सदस्यांच्या जागांवर फक्त नऊ महिलांचे अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्राम विकासात एकी हा महत्वाचा भाग आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवरील राजकारणामुळे गावात गट तट पडू नये, यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यात आली. ग्रामपंचायतीत सर्व जागांवर महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला गेला. गावच्या विकासासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली असून महिलांच्या नेतृत्वात विकास करण्याचा निर्धार केल्याचं ग्रामस्थांनी सांगितले.

अंगापूर ग्रामस्थांनी राजकीय नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते, असं लवकरच ग्रामपंचायतीची सूत्रे हातात घेणाऱ्या महिलांनी सांगितले. ग्रामस्थांनी दिलेल्या संधींच्या आणि विश्वासाच्या जोरावर ग्रामस्थांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार केल्याचं महिलांनी सांगितले. पाच वर्षाच्या काळात एका रुपयाचाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, असा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या: 

आधी बिनविरोध निवडीचे फ्लेक्स, नंतर निवडणुकीची तयारी; ‘या’ ग्रामपंचायतीचा गोंधळात गोंधळ

उंडाळकर घराण्याचं अखेर मनोमिलन; ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र

(Angapur Tarf  Targaon Gram panchayat will elect unopposed with all woman representatives)