धक्कादायक ! मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या, विष घेतलं; कारण काय?

मनसेतून शिंदे गटात आलेले निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या, विष घेतलं; कारण काय?
nilesh majhire wifeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 9:15 AM

पुणे: मनसेतून शिंदे गटात आलेले निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं कळतं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

शिंदे गटाचे बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून कळलेलं नाही.

अंतर्गत कुरबुरीमुळे पक्ष सोडला

माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पुण्यातील डॅशिंग नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थ होते.

वसंत मोरे हे मनसेत काहीसे अडगळीत पडले होते. त्यामुळे माझिरे हे नाराज होते. तसेच पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर मनसेने त्यांची हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं होतं.

विठ्ठलाशी वाद नाही

मनसेत असताना माझिरे यांनी ‘बाबू वागस्कर हटाव, मनसे बचाव’ अशी भूमिका घेतली होती. आपला आपल्या विठ्ठलाशी वाद नाही. इतरांशी आहे, असं म्हणत त्यांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदे गट वेगळा बाहेर पडला आणि भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत आला. त्यामुळे माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.