AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय नेत्यावर गोळीबार, राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर कसा झाला हल्ला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत (Baramati NCP Leader Raviraj Taware attacked)

बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय नेत्यावर गोळीबार, राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर कसा झाला हल्ला?
रविराज तावरे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 01, 2021 | 8:34 AM
Share

बारामती : जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर सोमवारी दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार केला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात माळेगाव येथे ही घटना घडली. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली आहे (Baramati Crime News NCP Leader Raviraj Taware attacked by gunmen)

नेमकं काय घडलं?

रविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक घटनास्थळी

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन रविराज तावरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेतलं जाईल असंही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय

रविराज तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. माळेगावची ग्रामपंचायत रद्द होऊन नुकतीच नगरपंचायत झाली. येत्या काही काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. गाव पातळीवरील राजकारणातून हा प्रकार झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. (Baramati NCP Leader Raviraj Taware attacked)

रविराज तावरेंवर खासगी रुग्णालयात उपचार

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधत सूचना केल्या. या घटनेनंतर माळेगावमधील वातावरण तणावपूर्ण बनले असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविराज तावरे यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एकूणच बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे. आता या प्रकरणात नेमकं मास्टरमाईंड कोण हे शोधणे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

(Baramati Crime News NCP Leader Raviraj Taware attacked by gunmen)

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर