
पुणे : फ्रॅक्चर्ड फ्रीडम (Fractured Freedom) या पुस्तकावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता आणखी एका पुस्तकाला विरोध होतोय. डॉ.अरुण गद्रे लिखित उत्क्रांती – एक वैज्ञानिक अंधश्रद्धा या पुस्तकाला विरोध करण्यात येत आहे. भाजपचे माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत (Pradeep Rawat) यांनी या पुस्तकाला विरोध केलाय.
फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या वादानंतर आणखी एका पुस्तकाचा वाद सुरू झाला आहे. उत्क्रांती – एक वैज्ञानिक अंधश्रद्धा या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराला विरोध करण्यात येत आहे. विज्ञानाच्या विरोधाभासी भूमिका मांडणाऱ्या या पुस्तकाला सरकारने पुरस्काला कसा जाहीर केला?, असं सवाल प्रदीप रावत यांनी विचारला आहे.
डॉ.अरुण गद्रे लिखित या पुस्तकाला सरकारचा महात्मा फुले ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. गद्रे यांच्या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराला रावत यांनी आक्षेप घेतला आहे.
कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केलाय. या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार अचानकपणे रद्द केला. त्यावर साहित्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोबाड गांधी हे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सदस्य होते. माओवादी कम्युनिस्ट संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तर या संघटनेचे सदस्य असलेले कोबाड गांधी हेही दहा वर्षे तुरुंगवास भोगून आलेले आहेत. कोबाड गांधी यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक लिहिले. त्यानंतर त्या पुस्तकाचा अनुवाद अनघा लेले यांनी केला. तर त्यानंतर या पु्स्तकाला पुरस्कार जाहीर झाला पण तो अचानकपणे रद्द झाला. त्यावरून वाद निर्माण झाला.