Madhav Bhandari : तरुणांची संख्या सैन्य दलात वाढू नये, असा विचार करणाऱ्या शक्ती कोण? ‘अग्निपथ’वरून माधव भांडारींचा राहुल गांधींना टोला

| Updated on: Jun 18, 2022 | 2:19 PM

राज्यसभेला घोडेबाजार झाला नाही. त्यावेळी सर्व आमदारांनी आपापल्या बुद्धीनुसार मतदान केले आणि येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतदेखील तेच होईल, असे वक्तव्य माधव भांडारी यांनी केले आहे. आगामी विधान परिषदेसंबंधी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

Madhav Bhandari : तरुणांची संख्या सैन्य दलात वाढू नये, असा विचार करणाऱ्या शक्ती कोण? अग्निपथवरून माधव भांडारींचा राहुल गांधींना टोला
विरोधकांवर टीका करताना भाजपा नेते माधव भांडारी
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : तरुणांना चार वर्षांची का असेना पण रोजगार मिळवून देणारी अग्निपथ (Agneepath Scheme) ही योजना आहे. केंद्र सरकारने योजना आणल्यावर लगेच ती योजना हाणून पाडण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. लोकांना काम मिळू नये, यासाठी काम करणाऱ्या शक्तीचे नेतृत्व जर राहुल गांधी करत असतील तर मग दुर्दैव आहे, अशी टीका भाजपा नेते माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. अग्निपथ योजनेला देशभर विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींना (Rahul Gandhi) मार्गदर्शन करणाऱ्या शक्ती देशात आहेत, की विदेशात हा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तरूण हा लष्करीदृष्ट्या मजबूत होण्यासाठी ही योजना आहे. मग तरुणांची संख्या सैन्य दलामध्ये वाढू नये, असा विचार करणाऱ्या शक्ती कोण आहेत, याचा शोध घ्यायला हवा, अशी टीका त्यांनी यावेळी राहुल गांधींवर केली आहे.

‘घोडेबाजार झाला हे मी मानत नाही’

राज्यसभेला घोडेबाजार झाला नाही. त्यावेळी सर्व आमदारांनी आपापल्या बुद्धीनुसार मतदान केले आणि येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतदेखील तेच होईल, असे वक्तव्य माधव भांडारी यांनी केले आहे. आगामी विधान परिषदेसंबंधी त्यांनी आपले मत व्यक्त केले. विधान परिषदेचे मैदान जवळ आहे. कोण जिंकणार, याचा खुलासा लवकरच होईल. निवडणुकीबाबत आमच्या नेत्यांना आत्मविश्वास आहे. आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. महाविकास आघाडी हे तिघाडी सरकार आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांमध्येच नाही, तर पक्षांच्या अंतर्गत विरोध आहे. याचेच परिणाम राज्याच्या राजकारणावरदेखील होत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

‘जनतेच्या हिताचे प्रश्न हाताळले जात नाहीत’

महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत विरोधामुळे केवळ राजकारण होत आहे. त्यांच्यात एकवाक्यता नाही. याचेच परिणाम राज्याच्या राजकारणावरदेखील होत आहेत. जनतेच्या हिताचे प्रश्न हाताळले जात नाहीत. भाजपाचा विरोध हा केवळ शिवसेनेला नाही तर महाविकास आघाडीलाच आहे. सत्ताधारी पक्षाने पुढाकार घेऊन निवडणुका या बिनवरोधी करायच्या असतात. राज्यात आधी या सगळ्या निवडणुका होत नव्हत्या. आता होत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. कारण सरकार विरोधकांशी कुठलाच संवाद करत नाही, अशी टीका त्यांनी केली.