मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवारांना कफ झाला होता. शिवाय थकवा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांचा नियोजित दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला.

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली
| Updated on: Nov 02, 2026 | 5:14 PM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. मात्र, पवारांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

शरद पवार यांनी शनिवार 31 ऑक्टोबर आणि रविवार 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. यावेळी तुळशी गावात त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला होता. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या होत्या. या समस्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

Loading...

 

अचानक दौरा रद्द

मात्र, आज होणारा शरद पवार यांचा दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला होता. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचं कारण देऊन हा दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र, पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पवार हे सोलापूरहून पुण्याला आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबी रुग्णालयात त्यांच्या विविध चाचण्या केल्या जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पवारांना कफ झाला होता. तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

दिवाळीनंतर पवारांचा दौरा

दिवाळीनंतर शरद पवार हे करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहणी करणार आहे. काल रात्री बारामती, भिगवण परिसरात मोठा पाऊस झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. करमाळयात दिवाळीनंतर शरद पवार नक्की पाहणी करतील, असं सांगतानाच पवारांना भेटूनच मी करमाळ्याला गेलो होतो. मी दौऱ्याची तयारी करत होतो, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us