Pune crime : न्यायालयाच्या परिसरात आरोपीला दिला गांजा; पुण्यातला धक्कादायक प्रकार, पोलीस घेतायत आरोपीचा शोध

मेहबूब पठाण याला देण्यात आलेल्या पुडीमध्ये जवळपास एक ग्रॅम गांजा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार कसा घडला, याविषयीचा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

Pune crime : न्यायालयाच्या परिसरात आरोपीला दिला गांजा; पुण्यातला धक्कादायक प्रकार, पोलीस घेतायत आरोपीचा शोध
पुणे न्यायालय (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 5:16 PM

पुणे : न्यायालयाच्या परिसरात आरोपीला गांजा (Cannabis) दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मोक्का गुन्ह्यातील अटक आरोपीला न्यायालयाच्या परिसरात गांजा दिल्याचा हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त असतानादेखील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी (दि. 9) शिवाजीनगर न्यायालयाच्या (Shivaji nagar court) आवारात ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी गांजा पुरविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबूब जब्बार पठाण (वय 25, रा स्वारगेट) याच्यासह त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मेहबूब पठाण याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात मोक्काअंतर्गत (Maharashtra Control of Organised Crime Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीस त्याच्या साथीदारांनी गांजा दिला. तपासात हे उघड झाले आहे.

बंदोबस्त असतानाही…

पठाण याला गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी मोक्कातील आरोपी असल्याने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पोलिसांचा हा बंदोबस्त असताना कोर्टातील गर्दीचा फायदा घेत आरोपी मेहबूब पठाण याच्या साथीदाराने त्याला गांजाची पुडी दिली. हे सर्व होत असताना पोलिसांच्या लक्षात आले नाही. मात्र अंगझडती घेतली असता हा प्रकार उघड झाला.

एक ग्रॅम गांजा

मेहबूब पठाण याला देण्यात आलेल्या पुडीमध्ये जवळपास एक ग्रॅम गांजा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार कसा घडला, याविषयीचा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, पठाण याला गांजा पुरविणाऱ्यांवर शिवाजीनगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी याविषयीची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

‘सीसीटीव्ही तपासणार’

अरविंद माने म्हणाले, की गर्दीचा फायदा आरोपींकडून घेण्यात आला असावा. याप्रकरणी न्यायालय परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आरोपींचा शोध पोलीस घेतील, असे ते म्हणाले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.