भेदभाव न करता मदत द्या, मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्या; एकनाथ शिंदे यांचा केंद्राला सल्ला

| Updated on: Jul 31, 2021 | 10:17 AM

केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे. (central government should help immediately flood affected maharashtra, says eknath shinde)

भेदभाव न करता मदत द्या, मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्या; एकनाथ शिंदे यांचा केंद्राला सल्ला
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
Follow us on

पुणे: केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. (central government should help immediately flood affected maharashtra, says eknath shinde)

एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. कोकणात महापुरानं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आज कँम्प राबवतोय. राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे, असं सांगतानाच पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केलं जाईल. पॅकेज जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

शिंदेंची पूरग्रस्तांना मदत

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाण्याताली डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन शिरोळ यांच्या वतीने शिरोळ तालुक्यामधील निवारा छावणीवर असलेल्या पूर बाधीतांसाठी गुरुवारी व शुक्रवारी आरोग्य तपासणी व औषधाचे वाटप करण्यात आले. रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली आहेत. या ठिकाणी जवळपास 250 पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला.

यानंतर जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालयातील निवारा छावणीमध्ये असलेल्या पूर् बाधितांच्या आरोग्याची तपासणी करून औषधे पुरवण्यात आली. या ठिकाणी देखील जवळपास 265 पूर् बाधीतांना आरोग्य तपासणी सह औषध पुरवण्यात आले. यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने नितीन हिलाल, सागर झाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन च्या वतीने डॉक्टर शेखर गौराज,चेतन मगदूम व परवेज मुल्ला उपस्थित होते. (central government should help immediately flood affected maharashtra, says eknath shinde)

 

संबंधित बातम्या:

प्रत्येकवेळी नुकसान., जगायचं तरी कसं… भुवनेश्वरवाडीच्या पूरग्रस्तांच्या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व्यथा

तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा ठरली, नातेवाईकांना तातडीने 2-2 लाखाची मदत

नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री

(central government should help immediately flood affected maharashtra, says eknath shinde)