प्रत्येकवेळी नुकसान., जगायचं तरी कसं… भुवनेश्वरवाडीच्या पूरग्रस्तांच्या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व्यथा

पलुस तालुक्यातील 22 गावात महापूराचा जबरदस्त फटका बसला आहे. प्रत्येकवेळी नुकसान., जगायचं तरी कसं..असा सवाल आता येथील ग्रामस्थ करत आहेत. मनाला चटका लावणाऱ्या या व्यथा आहेत.

प्रत्येकवेळी नुकसान., जगायचं तरी कसं... भुवनेश्वरवाडीच्या पूरग्रस्तांच्या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व्यथा
सांगलीच्या नागरिकांच्या व्यथा
शंकर देवकुळे

| Edited By: Akshay Adhav

Jul 31, 2021 | 9:13 AM

सांगली : पावसानं जीव कावलेला, त्यातच दोन दिवस महापूर काय आला… घर,  शिवारात होत्याच नव्हतं करुन गेला. अशा कृष्णाकाठच्या गावागावातील महापूराच्या व्यथा… तर आयुष्याच्या शेवटच्या पानावर, खळाळणाऱ्या डोळ्यातून वेदनांचा हिशोब मांडणाऱ्या आक्काताई रावळ. त्यांच्या घरातून चार होती नव्हती तेवढी भांडीही महापूराने वाहून गेलीत.पलुस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी या येथील प्रत्येक घराघराची अशी व्यथा दिसते.

भुवनेश्वरीचे प्रसिद्ध तिर्थस्थान, औदुंबरच्या दत्तगुरूंचे मुळस्थान असणाऱ्या, 65 घरे आणि सुमारे साडेचारशे लोकवस्ती असणाऱ्या या गावातील लोकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. आता पूर ओसरतोय, अजून गावात यायला धड वाटही नाही. बुरूंगवाडी धनगांव मार्गाने चिखलातून कशीबशी वाट काढत आलेल्या काही गावकऱ्यांना घराघरातून गाळ उपसणे मुश्कील झालंय.

पलूसच्या 22 गावांना महापुराचा फटका

अन्न, पाणी, वीज प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. पलुस तालुक्यातील 22 गावात महापूराचा जबरदस्त फटका बसला आहे. प्रत्येकवेळी नुकसान., जगायचं तरी कसं..असा सवाल आता येथील ग्रामस्थ करत आहेत. मनाला चटका लावणाऱ्या या व्यथा आहेत.

पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शनिवार व रविवारी पूरग्रस्त भागातील सर्व अस्थापना सुरु ठेवा

कोव्हिड स्थितीनुसार सांगली जिल्हा स्तर ३मध्ये समाविष्ट असल्याने अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व अस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. सदर अस्थापना शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील असे आदेशित केले आहे.

तथापि सद्यस्थितीत पूरग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरू आहेत . सदर पंचनामे वेळेत पंचनामे वेळेत व मुदतीत होण्यासाठी शनिवार दिनांक 31 जुलै रविवार दिनांक १ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागातील सर्व स्थापना फक्त पंचनामे करण्यासाठी सुरू ठेवणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत पूरग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असल्याने सदर पंचनामे वेळेत व मुदतीत होण्यासाठी शनिवारी रविवारी पूरग्रस्त भागातील सर्व अस्थापना फक्त पंचनामे करण्यासाठी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

(Due To Floods Bhuvneshwarwadi People huge Losses)

हे ही वाचा :

आता शेतकरी मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी, 7/12 नंतर फेरफार ऑनलाइन करण्याचा निर्णय

रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवर झाड पडल्यास विम्याचे पैसे मिळतात का?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें