मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का?; भुजबळांची हसता हसता ऑफर!

| Updated on: Feb 04, 2021 | 2:13 PM

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यापासून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (chhagan bhujbal offer sudhir mungantiwar to join ncp)

मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का?; भुजबळांची हसता हसता ऑफर!
Follow us on

पुणे: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यापासून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच महाविकास आघाडीतील नेत्यांनी मजेदार प्रतिक्रिया देऊन राज्यातील जनतेचं भरपूर मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळही त्यात मागे नसून त्यांनीही मार्मिक प्रतिक्रिया देऊन मुनंटीवारांची गोची केली आहे. (chhagan bhujbal offer sudhir mungantiwar to join ncp)

छगन भुजबळ आज पुण्यात होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटू शकतात. मुनगंटीवार भेटू शकतात. फडणवीस भेटू शकतात. चंद्रकांतदादाही भेटू शकतात, असं सांगतानाच पक्षात येणार का म्हणून मुनगंटीवारांना विचारा, असं भुजबळ यांनी हसत हसत म्हणताच एकच खसखस पिकली.

चर्चा थांबल्यावरच कळेल

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, त्याबाबत भुजबळ यांना विचारण्यात आले. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद देण्याची चर्चा मीही ऐकून आहे. ही चर्चा थांबल्यावरच खरं काय ते कळेल, असंही ते म्हणाले.

शरजीलला फटकारले

यावेळी त्यांनी शरजील उस्मानी याला फटकारले. शरजीलचे शब्दच चुकीचे आहे. आम्हीही मनुवादाविरोधात बोलतो. पण त्याचा अर्थ कुणाच्या भावना दुखावण्याचा नसतो. पोलीस हे प्रकरण हाताळत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंचा पुतळा

सावित्रीबाई फुले पुणेव विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत लवकरच कार्यवाही करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मग तुम्ही बोला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या देशातील सेलिब्रेटीजनी बाहेरच्या देशातील लोकांनी यावर बोलू नये असं मत व्यक्त केलंय. मग माझं त्यांना सांगणं आहे की, तुम्ही तरी त्यावर बोला. हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे हे बरोबर आहे. पण इतके दिवस शेतकरी आंदोलन करतायत, रेल्वे ट्रॅकवर बसून, रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत, त्यावर पण बोलायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. (chhagan bhujbal offer sudhir mungantiwar to join ncp)

साहित्य संमेलनाला नवा आयाम मिळेल

सुमारे पाच दशकाहून अधिक काळ आपल्या लेखनाने मराठी वाचकांना केवळ जगाचेच नव्हे, तर ब्रह्मांडाचे ज्ञान दिले. विज्ञानात साक्षर करणारी, माहिती देणारी असंख्य पुस्तके असतात. परंतु विज्ञानाला मानवी जगण्याचे नवे तत्व देऊन वाचकांना वैचारिक दिशा देण्याचे महत्वाचे काम आपल्या साहित्याने केले आहे. म्हणूनच आम्हास हा अतीशय उचित गौरव वाटत आहे. जयंत नारळीकरांसारखे वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला अतिशय नवा आयाम देणारे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (chhagan bhujbal offer sudhir mungantiwar to join ncp)

 

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीच्या ‘संवाद यात्रे’ने आघाडीत उलथापालथ?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री कोण होणार? बातमी आली; थोरात, राऊत, वडेट्टीवारांच्या नावांची चर्चा सुरू?

जर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद, शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला काय?

(chhagan bhujbal offer sudhir mungantiwar to join ncp)