Chhagan Bhujbal : ‘धर्माधर्माचं विष महाविद्यालयापर्यंत आणू नका, शिक्षणानं समाजाला एकत्र करा’

सगळ्यांनी शांततेने आणि एकत्र राहिले पाहिजे. कर्नाटकात (Karnataka) जे झाले ते सगळीकडे पसरत आहे. हे व्हायला नको. शिक्षणाचा (Education) फायदा समाजाला एकत्र करण्याचे काम करण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal : धर्माधर्माचं विष महाविद्यालयापर्यंत आणू नका, शिक्षणानं समाजाला एकत्र करा
छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 5:25 PM

पुणे : सगळ्यांनी शांततेने आणि एकत्र राहिले पाहिजे. कर्नाटकात (Karnataka) जे झाले ते सगळीकडे पसरत आहे. हे व्हायला नको. शिक्षणाचा (Education) फायदा समाजाला एकत्र करण्याचे काम करण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. अशा लढाया, वाद शिक्षण संस्थामध्ये नको, हे करणारे राजकारणी असतात, विद्यार्थ्यांमध्ये या भावना नको, असेही ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की उद्या आम्ही मंत्रालयात 11 वाजता बैठक घेत आहोत. यामध्ये सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा आणि त्या स्मारकाचा विकास करण्यासाठी बैठकीत चर्चा केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीच आमची देवतं आहेत, असेही ते म्हणाले.

‘धर्मा-धर्माचे विष महाविद्यालयात नको’

रस्त्यावर येण्यापेक्षा चर्चेतून आम्ही प्रश्न सोडवत आहोत. अलीकडचे लोक म्हणजे राजकारणी. काही लोक धर्मा-धर्मामधले विष महाविद्यालयात आणायला लागलेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. हे धर्मा-धर्माचे विष तुम्ही विद्यालयात आणू नका, विद्यार्थ्यांना शिकू द्या, असे आवाहन त्यांनी केले.

‘ओबीसींचा प्रश्न सोडवणार’

ओबीसींसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मदत मिळाली आहे. सुप्रीम कोर्ट आणि आयोगाच्या माध्यमातून ओबीसींचा प्रश्न सोडवत आहोत. इंपेरिकल डेटा मिळाला पाहिजे. ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्या वेळेला देवेंद्र फडणवीसांशी बोललो. तर ओबीसी आरक्षणासंदर्भात ज्या ज्या लोकांशी बोलायची गरज असेल त्यांच्याशी बोलणार, एक एक ओबीसी शोधण्याचे काम सध्या आयोगाने सुरू केले आहे, त्यामुळे आता त्यासंदर्भात काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

‘रोजच साजरी व्हावी शिवजयंती’

शिवजयंतीचा 30/40 वर्षांचा आहे, त्यावर कमिटीही नेमण्यात आली आहे, माझे म्हणणे असे आहे, की शिवाजी महाराजांची शिवजयंती रोज साजरी झाली तरी हरकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा :

फुले दाम्पत्यांनी सांगितलं धर्माधर्मामध्ये भांडणं लावू नका, आपण फक्त बोलतो, पण पाळणार कोण?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांसमोर सवाल

Savitribai Phule Statue| क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या 12 फुटी पुतळ्याचे अनावरण, ठाकरे, फडणवीस एकाच मंचावर

सावित्रीबाईंनी महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण केले; शिक्षण मोफत देण्याची पहिली मागणी त्यांचीच, काय म्हणाले फडणवीस?