सोलापूरच्या ‘चिमणी’चा आज फैसला!

| Updated on: Dec 22, 2020 | 10:43 AM

सोलापूरच्या होटगी रस्त्यावरील विमान सेवेला अडसर असलेल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा आज होणार फैसला आहे.

सोलापूरच्या चिमणीचा आज फैसला!
Follow us on

सोलापूर : सोलापूरच्या होटगी रस्त्यावरील विमान सेवेला अडसर असलेल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा आज होणार फैसला आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी न्यायालयाच्या स्थगितीकडे बोट दाखवत सोलापूरकरांना सबुरीचा सल्ला दिला होता. आता न्यायालयीन अडचण संपुष्टात आली असल्याने प्रशासनातील अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखणार की न्यायालयाचा अवमान करणार, याकडे समस्त सोलापूरवासियांचं लक्ष लागलं आहे. (Chimney Sugar Factory Obstructs Airline Of Solapur)

मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 20 ऑगस्ट 2018 रोजी कारखान्याचे अपील फेटाळून लावले. भारतीय विज्ञान प्राधिकरण आणि नागरी विमान उड्डाण संचलनालय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काम करतात. त्यांच्या नियमांचं पालन केलं नाही तर समाजात चांगला संदेश जाणार नाही, असं उच्च न्यायालयात आदेशात म्हटलं होतं.

उच्च न्यायालयाने 2019 ला दिलेल्या आदेशात, चिमणी अधिकृतच आहे मग ती पाडायला काय अडचण आहे? प्रशासन कसली वाट पाहत आहे?, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. आता सोलापूरच्या प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी, असं न्यायालयाने म्हटलं होतं.

चिमणी जमीनदोस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आश्वासने देऊन झाले आहेत. आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, “चिमणी पाडण्यास मी तयार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा लागेल. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 22 डिसेंबरपर्यंत थांबा”
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, “केवळ सात दिवसांची मुदत द्या. चिमणीसंदर्भात मीच निर्णय घेतो. त्यानंतर शंभरकर यांनी शिक्षक आणि हदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेचं कारण पुढे केले.

(Chimney Sugar Factory Obstructs Airline Of Solapur)

संबंधित बातम्या

सोलापूरच्या विमानसेवेला साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा