स्वराज्य संस्थाच्या निवडणूकात ‘एकला चलो’ च्या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

| Updated on: Nov 30, 2021 | 1:14 PM

महापालिका ग्रामपंचायत अशा सर्वच संस्थांमध्ये अगदीच मोजका अपवाद वगळता पक्षाची राजकीय अवस्था नाजूक आहे. पक्षाची सद्यस्थिती म्हणजे एकत्र लढलो फरफट होतेय अन एकटे लढायचे तर तितके पाठबळ नाही अश्या द्विधा मनस्थितीत कार्यकर्ते अडकले आहेत.

स्वराज्य संस्थाच्या निवडणूकात ‘एकला चलो’ च्या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
congress
Follow us on

पुणे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वातावरण निर्माण होत असताना, दुसरीकडे जिल्हातील काँग्रेसमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ‘एकला चलो’ ची भूमिका घेतल्याने जिल्हा काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांपासून ते साध्या कार्यकर्त्यांपर्यंत त्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका ग्रामपंचायत अशा सर्वच संस्थांमध्ये अगदीच मोजका अपवाद वगळता पक्षाची राजकीय अवस्था नाजूक आहे. पक्षाची सद्यस्थिती म्हणजे एकत्र लढलो फरफट होतेय अन एकटे लढायचे तर तितके पाठबळ नाही अश्या द्विधा मनस्थितीत कार्यकर्ते अडकले आहेत.

शहरातील स्थिती काय

एकूण विधानसभा मतदारसंघ- 8

काँग्रेस- 0

महापालिका- एकूण नगरसेवक- 164

काँग्रेसचे नगरसेवक- पक्षचिन्हावर आलेले- 9

सहयोगी-1

स्वीकृत-1

एकूण 11

  जिल्ह्यातील स्थिती

लोकसभेच्या एकूण जागा- 4

काँग्रेस-0

जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघ-10

काँग्रेसचे आमदार- 2

जिल्हा परिषदेच्या एकूण जागा- 75

काँग्रेसच्या जागा- 7

पंचायत समिती एकूण जागा- 150

काँग्रेसच्या जागा- 16

आमच्या निरीक्षक सोनल पटेल लवकरच पुण्यात येत आहेत. विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून आम्ही त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविणार आहोत.

रमेश बागवे- शहराध्यक्ष, काँग्रेस

आज सादर होणार दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी; ग्रोथ रेट 9 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज

MLC Election : उद्धव ठाकरे-नितीन गडकरींचे कट्टर समर्थक आमने-सामने, BJP च्या वसंत खंडेलवाल यांच्या अर्जावरील आक्षेप नागपूर खंडपीठानं फेटाळले

Video | भररस्त्यात रेड्यांची टक्कर ! मग काय बघ्यांची गर्दी अन् वाहतूकीचे तीन तेरा