MLC Election : उद्धव ठाकरे-नितीन गडकरींचे कट्टर समर्थक आमने-सामने, BJP च्या वसंत खंडेलवाल यांच्या अर्जावरील आक्षेप नागपूर खंडपीठानं फेटाळले

अकोला,बुलडाणा,वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका नगरसेवक पराग कांबळे व रमेश बजाज यांची याचिका सोमवारी नागपूर हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

MLC Election : उद्धव ठाकरे-नितीन गडकरींचे कट्टर समर्थक आमने-सामने, BJP च्या वसंत खंडेलवाल यांच्या अर्जावरील आक्षेप नागपूर खंडपीठानं फेटाळले
GOPIKISHAN BAJORIYA AND VASANT KHANDELWAL

अकोला: राज्यातील विधानपरिषदेच्या (Maharashtra MLC Election) स्थानिक स्वराज संस्थेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी मुंबईतील दोन, कोल्हापूर आणि नंदुरबारची एक जागा बिनविरोध झाली आहे. नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम (Akola Buldana Washim) या दोन जागांवर निवडणूक होत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम विधान परिषदेचे उमेदवार वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळल्याने आता निवडणूक चुरशीची होणार आहे. गोपिकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे उमेदवार असून ते गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. दुसरीकडे सेना भाजप युती तुटल्यानं भाजपनं इथं वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देत निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे समर्थक समजले जातात. या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.

वसंत खंडेलवाल यांच्या अर्जावर आक्षेप

अकोला,बुलडाणा,वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका नगरसेवक पराग कांबळे व रमेश बजाज यांची याचिका सोमवारी नागपूर हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. अकोला, बुलढाणा ,वाशीम विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणात भाजपातर्फे वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी 22 नोव्हेंबरला नामांकन अर्ज सादर केला होता. सदर नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्यात आली आणि छाननी दरम्यान या मतदारसंघातील मतदारांपैकी एक असलेले नगरसेवक पराग मधुकर कांबळे यांनी भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाच्या मान्यतेवर आक्षेप नोंदवला. रमेश सत्यनारायण बजाज यांनी देखील आक्षेप नोंदविला होता.

नागपूर खंडपीठानं आक्षेप फेटाळले

रमेश बजाज हे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत,तर हे दोन्ही आक्षेप रिटर्निंग ऑफिसरने फेटाळले होते. रिटर्निंग अधिकाऱ्याने दिलेल्या आक्षेपांना नकार दिल्या विरोधात अनुक्रमे पराग मधुकर कांबळे आणि रमेश सत्यनारायण बजाज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन स्वतंत्र रिट याचिकांद्वारे उमेदवारी अर्जाला आव्हान दिले होते. मात्र, सोमवारी उच्च न्यायालयाने दोन्ही रीट याचिका फेटाळून लावल्या असल्याने आता या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

उमेदवारांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

कारण यावेळी ही निवडणूक दोन्ही उमेदवारांच्या प्रतिष्ठेची बनली आहे,गेल्या 18 वर्षा पासून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया या मतदारसंघातून आमदार आहेत. यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती नसल्याने दोन चांगले मित्र आणि शेजारी हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. वसंत खंडेलवाल हे एक सराफाचे व्यापारी असून सुरुवाती पासून भाजपसोबत जोडलेले असून नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ही निवडणूक ठाकरे विरुद्ध गडकरी अशीच असल्याची चर्चा सर्वदूर सुरु आहे. तर, दोन्ही उमेदवार एकमेकांवर ताशेरे ओढायला कुठलीच कसर सोडत नसून ही निवडणूक आता चुरशीची होणार असून यामध्ये कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या:

फ्रंटलाईन वर्कर्सचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं, सेनेचं हे धोरण निंदनीय, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर अधिवेशनावर बहिष्कार टाकणार; विरोधक आक्रमक

Maharashtra MLC Election 2021 Mumbai High court Nagpur Bench cancelled writ pettion file against BJP Candidate Vasant Khandelwal in Akola Washim Buldana Constituency

Published On - 12:50 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI