खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर अधिवेशनावर बहिष्कार टाकणार; विरोधक आक्रमक

कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या 5 पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून या विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर अधिवेशनावर बहिष्कार टाकणार; विरोधक आक्रमक
congress meeting
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 11:19 AM

नवी दिल्ली: कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या 5 पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून या विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर  आम्ही अधिवेशनावर बहिष्कार टाकू, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.

राज्यसभेतील 12 सदस्यांना काल निलंबित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांचं निलंबनावर चर्चा करण्यात आली. निलंबन मागे घेतलं नाही तर अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी निलंबित खासदारांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे.

कारवाई का?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. 12 ऑगस्ट रोजी संसदेत हायव्हेल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये उतरले होते. या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातल्याने त्यांना आवरण्यासाठी पहिल्यांदाच संसदेत मार्शलला बोलावण्यात आलं होतं. सभागृहात कागद भिरकावणे, फाडणे आणि टीव्ही स्क्रिन तोडण्याचा या खासदारांवर आरोप आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केले होते. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस, टीएमसी, सीपीआय आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश होता. गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 6 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यात शिवसेनच्या 2 खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

निलंबित खासदार

प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना अनिल देसाई, शिवसेना फुलो देवी नेताम, काँग्रेस छाया वर्मा, काँग्रेस रिपुन बोरा, काँग्रेस राजामणि पटेल, काँगेस सैय्यद नासिर हुसेन, काँग्रेस अखिलेश प्रसाद सिंह, काँग्रेस एलामरम करिम, सीपीएम डोला सेन, तृणमूल काँग्रेस शांता छत्री, तृणमूल काँग्रेस बिनय विश्वम, सीपीआई

मोदींनी बोलावली बैठक

एकीकडे विरोधकांची बैठक सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बैठक बोलावली आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरही उपस्थित आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर काय करायचे या बाबत या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Rahul gandhi : चर्चेशिवाय कृषीकायदे मागे कसे घेतले? सरकार चर्चेला घाबरतंय, राहुल गांधींचा निशाणा

विमानतळावर स्क्रिनिंग, जिनोम सिक्वेन्सिंग… ओमिक्रॉन रोखण्यासाठी ‘या’ गोष्टींवर भर देण्यास सुरू

शशि थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबतचा सेल्फी वादात! सोशल मीडियावरील टीकेनंतर थरुरांनी मागितली माफी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.