AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शशि थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबतचा सेल्फी वादात! सोशल मीडियावरील टीकेनंतर थरुरांनी मागितली माफी

थरूर यांनी संसदेतील 6 महिला खासदारांसोबत एक सेल्फी (Selfie) पोस्ट केला आणि त्यावर कोण म्हणतं की लोकसभा (Loksabha) काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही? असं थरूर म्हणाले. थरूर यांच्या याच ओळीवरुन त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे.

शशि थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबतचा सेल्फी वादात! सोशल मीडियावरील टीकेनंतर थरुरांनी मागितली माफी
शशि थरूर सेल्फी
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 5:01 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशि थरूर (Shashi Tharoor) अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे आणि लिखाणामुळेही वादात सापडले आहेत. आता थरूर यांचा एक सेल्फी वादात आलाय. या सेल्फीवरुन शशि थरूर यांच्यावर सोशल मीडियावर (Social Media) जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावरील टीकेनंतर थरूर यांनीही दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण दिलं आहे. थरूर यांनी संसदेतील 6 महिला खासदारांसोबत एक सेल्फी (Selfie) पोस्ट केला आणि त्यावर कोण म्हणतं की लोकसभा (Loksabha) काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही? असं थरूर म्हणाले. थरूर यांच्या याच ओळीवरुन त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे.

थरूर यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीचा एक सेल्फी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. थरूर यांच्या या सेल्फीमध्ये काँग्रेसच्या खासदार परनीत कौर आणि जोथिमनी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डीएमकेच्या खासदार थमिजाची थंगापांडियन दिसत आहेत. थरूर यांनी हा सेल्फी ट्विट केला आणि ‘कोण म्हणतं की लोकसभा हे काम करण्यासाठी आकर्षक ठिकाण नाही? आज सकाळी माझ्या सहकारी खासदारांसोबत’, असं म्हटलं आहे.

सोशल मीडिया यूजर्सची थरूर यांच्यावर टीका

थरूर यांच्या या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, महिला तुमच्या कामाच्या ठिकाणाला आकर्षक करण्यासाठी लोकसभा सजवण्याची वस्तू नाही. त्या खासदार आहेत आम्ही तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. अन्य एका यूजर ट्विट करत म्हटलं की, तुम्ही जर अन्य सेक्टरमध्ये असता तर आकर्षक म्हणल्यामुळे तुम्हाला काढून टाकलं गेलं असतं. तर काही लोक थरूर यांच्या समर्थनातही लिहिताना दिसत आहेत.

थरूर यांच्याकडून दिलगिरी आणि स्पष्टीकरण

सोशल मीडियावर सुरु झालेल्या टीकेनंतर थरुर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सेल्फीची सगळी गोष्ट (महिला खासदारांच्या पुढाकाराने) मोठ्या विनोदात करण्यात आली होती. त्यांनीच मला सांगितलं होतं की त्याच भावनेने ती पोस्ट करा. पण मी क्षमस्व आहे की काही लोक नाराज झाले आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी असलेल्या सौहार्दाच्या या सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे मला आनंद झाला. इतकंच आहे’, असं थरूर यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

संजय राऊतांना फार गांभीर्याने घेऊ नका, ते एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का?, फडणवीसांचा खोचक सवाल

Photo : शार्दुल ठाकुरचा गर्लफ्रेन्ड मितालीसोबत साखरपुडा, लवकरच लग्नच्या बेडीतही अडकणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.