Congress MLA Letter : नाराजीचा प्रश्न नाही, सोनिया गांधींना का भेटणार? संग्राम थोपटेंनी दिल्लीवारीचं कारण सांगितलं

| Updated on: Mar 31, 2022 | 2:32 PM

आमदार कोणी नाराज आहेत हा मुद्दा नाही. 5 आणि 6 तारखेला संसदेत प्रशिक्षण आहे. 4 ते 6 एप्रिलला दिल्लीत आहोत, त्यामुळं आम्ही सोनिया गांधी यांना भेटणार आहोत. असं संग्राम थोपटे म्हणाले.

Congress MLA Letter : नाराजीचा प्रश्न नाही, सोनिया गांधींना का भेटणार? संग्राम थोपटेंनी दिल्लीवारीचं कारण सांगितलं
संग्राम थोपटे, आमदार
Image Credit source: TV9
Follow us on

विनय जगताप, टीव्ही 9 मराठी भोर, पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) स्थापन होऊन आता अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या 25 आमदारांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांच्या लेटरहेडवर प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. काँग्रेस आमदारांच्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. काँग्रेस आमदार नेमक्या कोणत्या कारणासाठी सोनिया गांधी यांना भेटणार आहेत यावरुन राज्याच्या राजकारणात तर्क वितर्क सुरु झाले होते. विरोधी पक्षांनी काँग्रेस सोबत शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु केल्या. मात्र, संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी कोणत्या कारणामुळं पत्र लिहिलं यांचं कारण सांगितलं आहे. संसदेत प्रशिक्षण कार्यक्रम असल्यानं आमदार दिल्लीला जाणार असल्याचं ते म्हणाले.

प्रशिक्षणासाठी दिल्लीला जाणार

सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पत्र दिलं आहे. संसदेत पाच आणि सहा तारखेला नवीन आणि जुन्या आमदारांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत आम्ही 5 आणि 6 तारखेला आहोत त्यामुळं सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी पत्र लिहिलं आहे. आम्ही प्रशिक्षणासाठी दिल्लीला येणार असल्यानं भेट मिळावी, अशी मागणी केलीय. प्रशिक्षणचं कारण आहे, यामध्ये कसलिही नाराजी नाही, असं आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटलंय. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना काय वाटतंय ते त्यांना विचारावं. आघाडी सरकार चांगल्या प्रकारे सुरु आहे. कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असं संग्राम थोपटे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे वरिष्ट नेते निर्णय घेत असतात त्यात आमचा काही रोल नसतो, त्यामुळं नाराजी असण्याचा विषय नाही, असं संग्राम थोपटे म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ

बाळासाहेब थोरात आमच्यासोबत तक्रारीचा प्रश्न नाही

आमदार कोणी नाराज आहेत हा मुद्दा नाही. 5 आणि 6 तारखेला संसदेत प्रशिक्षण आहे. 4 ते 6 एप्रिलला दिल्लीत आहोत, त्यामुळं आम्ही सोनिया गांधी यांना भेटणार आहोत. महाराष्ट्रातील आमच्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत. बाळासाहेब थोरात देखील सोबत असणार आहेत, त्यामुळं कुणाची तक्रार करण्याचा विषय नाही, असं संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलंय.

इतर बातम्या:

ED Raid : ‘आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार’, ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल

ED Raid : ईडीचं धाडसत्र सुरुच; सतीश उकेंच्या घरावरील धाड आणि कारवाईनंतर पटोलेंचा मोंदीवर निशाणा